तरुणांना भडकवणारे १० जण एटीएसच्या ताब्यात

राज्यभरातील तरुणांची माथी भडकवणार्या १० जणांना महाराष्ट्र एटीएसने औरंगाबाद आणि मुंब्रा परिसरातून सोमवारी राञी ताब्यात घेतलं. हे १० जण सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणांना आक्षेपार्ह लिंक पाठवत होते. पीपल्स फ्रंट इंडिया या संघटनेसाठी हे १० जण काम करत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

तरुणांना भडकवणारे १० जण एटीएसच्या ताब्यात
SHARES

राज्यभरातील तरुणांची माथी भडकवणाऱ्या १० जणांना महाराष्ट्र एटीएसने औरंगाबाद आणि मुंब्रा परिसरातून सोमवारी राञी ताब्यात घेतलं. हे १० जण सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणांना आक्षेपार्ह लिंक पाठवत होते. पीपल्स फ्रंट इंडिया या संघटनेसाठी हे १० जण काम करत असल्याचं निदर्शनास आलं आहे.


आयसिसची संबंध असल्याच्या संशय

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी कारवाई करत मुंब्य्रातील कौसा, अमृतनगर येथून चौघांना, तर औरंगाबादेतून पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. जानेवारीला साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्वाची कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे. आयसिसची संबंध असल्याच्या संशयावरून या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे सर्वही जण मागील बऱ्याच दिवसांपासून एटीएसच्या रडारवर होते. अखेर आज त्यांना एटीएसने ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. दरम्यान या प्रकरणी एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता काही संशयीतांची चौकशी करण्यात आली असल्याचं सांगितलं.


संलग्न कारवाई 

२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अथवा महाराष्ट्रात काही घातपात होण्याची शक्‍यता एटीएसने वर्तवली होती. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेले दहाही जण 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' या संघटनेशी संबंधित असून, राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेला (एनआयए) मिळालेल्या माहितीच्या आधारे ही संलग्न कारवाई करण्यात आली आहे. मुंब्य्रातून ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.



हेही वाचा -

हिप्नोटाईज करून लुटणारी टोळी जेरबंद

ईव्हीएम हॅकींग प्रकरण-निवडणुक आयोगाकडून पोलिसांत तक्रार दाखल



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा