Advertisement

coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात

सध्या भारतात कोरोना व्हायरसनं अक्षरशः थैमान घातलं आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी आर्थिक सहाय्याची गरज आहे. यासाठी अनेक कलाकारांनी पुढाकार घेत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत केली आहे.

SHARES
01/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
02/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
मराठी कलाकारांनीही कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी मदत करण्यास सुरूवात केली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1.5 लाखांची मदत जमा केली आहे. सईनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सुद्धा कोरोनाबाबत खबरदारी घेण्याबाबतचा व्हिडीओ शेअर केला होता.
03/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
कोरोनामुळे नाटकांचे सर्व प्रयोग सध्या रद्द करण्यात आल्यानं नाट्यव्यवसाय पूर्ण पणे ठप्प आहे. याची झळ हातावर पोट असणाऱ्या पडद्यामागच्या कामगारांना बसताना दिसत आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी २३ कामगारांचा विचार करून त्यांना प्रत्येकी १० हजाराची आर्थिक मदत केली आहे.
04/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत २५ लाखांची मदत केली आहे. या कठिण काळात आपल्या सरकारला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे, असं ट्विट लता दिदिंनी केलं आहे.
05/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता नाना पाटेकर यांनीही त्यांचा मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून ही मदत केली जात आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रत्येकी ५० लाखांची म्हणजे एकूण १ कोटीच्या निधीचं योगदान दिलं आहे.
06/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
अभिनेता विकी कौशल यानं १ कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीला केली आहे. मी घरातील सुखसोयींमध्ये माझ्या प्रियजनांबरोबर आहे, परंतु असे बरेच लोक आहेत जे माझ्याइतके भाग्यवान नाहीत... एक आरोग्यपूर्ण भविष्यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करू," असं ट्विट त्यानं केलं
07/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यननं १ कोटी रुपयांची मदत ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला केली आहे. ‘आतापर्यंत मी जे कमावलं, ते भारतीय नागरिकांमुळेच’ असं म्हणत कार्तिकनं मदत केली आहे.
08/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूईसीएस)च्या म्हणण्यानुसार, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननं राष्ट्रीय लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर फिल्म इंडस्ट्रीतील 25 हजार दैंनदिन वेतन कामगारांना आर्थिक पाठबळ देण्याचं वचन दिलं आहे. बिईंग ह्युमननं या २५ हजार कामरागांच्या खात्याचा तपशील मागवला आहे. प्रत्येकाच्या खात्यात ते पैसे जमा होतील.
09/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
कॉमेडियन कपिल शर्मानं पंतप्रधान सहायता निधीसाठी ५० लाखची मदत केली आहे. ज्यांना गरज आहे त्यांच्याबरोबर एकत्र उभे राहण्याची वेळ आली आहे, असं ट्विट करत ५० लाखांची मदत करत असल्याचं त्यानं जाहीर केलं.
10/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं २१ लाखांची मदत केली आहे. मानवतेला, देशाला आणि नागरिकांना आपली गरज आहे. हीच योग्य वेळ आहे काही करण्याची. मी आणि राज कुद्रा पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २१ लाख रुपयांचं दान देतोय,"असं तिनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
11/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
अभिनेता हृतिक रोशननं महानगर पालिकेच्या सफाई कामगारांसाठी आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानं N95 मास्क आणि FFP3 मास्क देणार असल्याचं जाहीर केलं आहे. मदतीची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट करून आभार मानले आहेत.
12/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
अभिनेता अक्षय कुमारनं देखील आपला मदतीचा हात कोरोना लढ्यासाठी पुढे केला आहे. अक्षयनं २५ कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. यावर अक्षय कुमारची पत्नी ट्विकल खन्ना हिनं ट्विट करत म्हटलं की, मला त्याचा अभिमान आहे. हे डोनेशन देताना त्यानं जरा सुद्धा विचार नाही केला.
13/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
पंतप्रधान सहाय्यता निधीत अभिनेता वरुण धवन यानं ३० लाख रुपयांची मदत केली आहे. आपण यावर नक्कीच मात करू, देश आहे तर आपण आहोत, असं ट्विट करत त्यानं मदत जाहीर केली.
14/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
टी-सिरीजचे मुख्य भुषण कुमार यांनी ११ कोटी रुपये पंतप्रधान सहय्यता निधीत दिले आहेत. आपण सध्या कठिण परिस्थितीत आहोत. अशावेळी आपण मदत केलीच पाहिजे. मी आणि माझे टी सिरीजचे संपूर्ण कुटुंब ११ कोटी रुपयांची मदत करत आहे. आपण याचाशी एकत्र लढू, असं ट्विट त्यांनी केलं.
15/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
अभिनेता राजकुमार राव यानं देखील पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानं किती रुपयांची मदत केली याचा खुलासा केला नाही. आपण एकत्रपणे लढा देण्याची हीच वेळ आहे. कोरोना व्हायरसची लढण्यासाठी आपल्या प्रशासनाला मदत करा, असं आवाहन त्यानं ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.
16/16
coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात
अभिनेत्री सोनम कपूरनं देखील मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे डोनेट केले आहेत. तिनं डोनेशन अमाऊंट उघड नाही केली. पण ट्विट करत तिनं मुखंयमंत्री सहायता निधीत पैसे डोनेट करण्याचं आवाहन केलं आहे.
संबंधित विषय
Advertisement