Advertisement

जाणून घ्या कोणता प्राप्तिकर फॉर्म तुमच्यासाठी ठरेल योग्य

प्राप्तिकर परताव्याची तारीख जवळ आली असून तुम्हाला आर्थिक वर्ष २०१८-१९ (मूल्यांकन वर्ष २०१९-२०) साठी तुमचं उत्पन्न सूचित करावं लागेल जाणून घेऊयात प्राप्तिकर परतावा भरण्याकरीता तुम्हाला कोणता प्राप्तिकर फॉर्म भरावा लागेल.

जाणून घ्या कोणता प्राप्तिकर फॉर्म तुमच्यासाठी ठरेल योग्य
SHARES

प्राप्तिकर परताव्याची तारीख जवळ आली असून तुम्हाला आर्थिक वर्ष २०१८-१९ (मूल्यांकन वर्ष २०१९-२०) साठी तुमचं उत्पन्न सूचित करावं लागेल आणि वाढवलेल्या मुदतीनुसार ३१ आॅगस्ट २०१९ च्या देय तारखेपर्यंत तुमचा प्राप्तिकर परतावा दाखल करावा लागेल. 

जेव्हा आपलं एकूण वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त असेल तेव्हा आपल्याला प्राप्तिकर परतावा भरणं आवश्यक आहे. ६० वर्षांपासून ८० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी मर्यादा ३ लाख रूपये आणि ८० वर्षांवरील वरील व्यक्तींसाठी ५ लाख रुपये मर्यादा आहे. जाणून घेऊयात आर्थिक वर्ष २०१८-१९ (मूल्यांकन वर्ष २०१९-२०) चा प्राप्तिकर परतावा भरण्याकरीता तुम्हाला कोणता प्राप्तिकर फॉर्म भरणं आवश्यक आहे.१. आयटीआर-१: एक निवासी भारतीय ज्याला पगारातून उत्पन्न मिळतं, एका घराची मालमत्ता आहे आणि बँकेच्या व्याजासारखं इतर उत्पन्न मिळतं, असे करदाने आपला कर परतावा भरण्यास आयटीआर-१ वापरू शकतात. तसंच, या सर्व उत्पन्नांना वार्षिक एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांसाठी सूचित केलं जाऊ शकतं. या कारणासाठी, तुमचं ‘एकूण उत्पन्न’ म्हणजे वरील सर्व स्त्रोतांमधून मिळालेलं एकत्रित वार्षिक उत्पन्न असेल ज्यातून खालीलप्रमाणे तुमची कर कपात केली जाईल:

 • अ.        वेतन भत्त्यांची वजावट
 • ब.         घरकर्जाची परतफेड (व्याजाच्या पेमेंटसहीत)
 • क.        भविष्य निर्वाह निधी, भरलेले एलआयसी प्रीमियम, वैद्यकीय विमा आणि इतर.

तुम्ही आयटीआर-१ मध्ये तुमचं वजा केलेले उत्पन्नही सूचित करू शकता जसं की लाभांश, पीपीएफचं व्याज, एलआयसी परिपक्वता मिळकत इ. हे उत्पन्न तुमच्या एकत्रित वार्षिक उत्पन्नाचा भाग नसेल.

२. आयटीआर-२: सर्व व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) त्यांचा परतावा आयटीआर-२ मध्ये भरू शकतात. आयटीआर-१ हा वर नमूद साधारण बाबतीत भरण्याचा फॉर्म असल्याने, व्यक्ती आणि एचयूएफ इतर बाबतीत (व्यवसाय किंवा पेशापासूनच्या उत्पन्नाव्यतिरिक्त) आयटीआर-२ भरू शकतात. गणना करण्यास, खालील बाबतीत आयटीआर-२ भरणं आवश्यक आहे:

 • अ.        ५० लाख रूपयांपेक्षा जास्त एकूण उत्पन्न असलेल्या व्यक्ती (निवासी आणि अनिवासी दोन्ही) 
 • ब.         अनिवासी व्यक्तींना आयटीआर-२ मध्ये त्यांचं उत्पन्न भरणं अनिवार्य आहे, एनआरआय व्यक्तींना भारतातील त्यांच्या वास्तव्याचे दिवस, त्यांचा निवासाचा देश आणि त्यांचा परदेशी करदाता ओळख क्रमांक प्रगट करणं आवश्यक आहे.
 • क.        एखाद्या कंपनीचे (खाजगी किंवा सार्वजनिक) संचालक असलेल्या व्यक्तींना आयटीआर-२ भरावा लागतो. व्यवसायात किंवा पेशामध्येअसलेल्या करदात्यांनी आयटीआर -३ फाॅर्म भरावा.
 • ड.         ज्या व्यक्तींजवळ त्यांच्या नावावर असूचीबद्ध इक्विटी समभागांमधील गुंतवणूक आहे, त्यांना आयटीआर-२ फाॅर्म भरावा लागेल. व्यवसायात किंवा पेशामध्ये असलेल्या करदात्यांनी आयटीआर-३ फाॅर्म भरावा.
 • इ.         एचयूएफनी आयटीआर-२ भरावा (व्यवसायात किंवा पेशामध्येअसलेल्यांव्यतिरिक्त)
 • ई.         व्यक्ती आणि एचयूएफ ज्यांना भांडवली लाभापासून उत्पन्न मिळतं जसं की शेअर्स किंवा सिक्युरिटिज किंवा अचल संपत्तीच्या विक्रीमधून मिळालेला लाभ किंवा तोटा.
 • उ.         घर संपत्तीमध्ये झालेलं नुकसान सूचित करायचं असलेल्या व्यक्ती किंवा असं नुकसान ज्यांना पुढे न्यायचं आहे अशा व्यक्ती
 • ऊ.        एका घर संपत्तीपेक्षा जास्त मालकी असलेले निवासी व्यक्ती
 • ए.         परदेशी उत्पन्न आणि संपत्तीधारक व्यक्ती आणि परदेशात अदा केलेल्या करांसाठी क्रेडिटचा दावा करणाऱ्या व्यक्ती

३. आयटीआर-३: व्यवसाय किंवा पेशामधून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती किंवा एचयूएफवर आयटीआर-३ लागू आहे. एकूण उत्पन्न ५० लाख रूपयांपेक्षा कमी असल्यावरही व्यवसाय किंवा पेशामधून उत्पन्न मिळवणाऱ्या (यामध्ये भागीदारी किंवा एलएलपीमधल्या नफ्याचा हिस्साही सामील आहे) प्रत्येक व्यक्ती किंवा एचयूएफ करदात्याने त्यांचा कर परतावा आयटीआर-३ मध्ये भरणं आवश्यक आहे. आयटीआर-३ भरताना व्यक्ती किंवा एचयूएफने त्यांचा व्यापार, नफा व तोटा खाते, जीएसटी कायद्यातंर्गत उलाढाल आणि त्यांच्या व्यवसायाचा ताळेबंद सादर करणं आवश्यक आहे.

व्यक्ती किंवा एचयूएफ सर्व उत्पन्न आयटीआर-३ द्वारे सूचित करू शकतात जसं की वेतन, घर संपत्ती, व्यवसाय किंवा पेशा, भांडवली लाभ आणि इतर स्त्रोत.

४. आयटीआर-४: व्यवसाय किंवा पेशापासून उत्पन्न मिळणाऱ्या व त्यावर अनुमानित आधारे कर आकारला जाणाऱ्या निवासी व्यक्ती, एचयूएफ आणि भागीदारी फर्म (एलएलपी व्यतिरिक्त) आयटीआर-४ मध्ये त्यांचा कर परतावा भरू शकतात. तसंच, आयटीआर-४ ला फक्त ५० लाखापर्यंतच्या एकूण उत्पन्नासाठी वापरता येतं.

व्यावसायिक करदाते त्यांच्या व्यवसायातून (२ कोटी रूपयापर्यंतच्या उलाढालीसाठी) ८% (बँकिंग चॅनलच्या माध्यमातून प्राप्तीमध्ये ६%) नफा म्हणून दाखवत अनुमानित आधारे त्यांचं व्यावसायिक उत्पन्न दाखल करू शकतात.

पेशेवर (प्रोफेशनल्स) करदाते त्यांच्या पेशातून (५० लाखापर्यंतच्या ढोबळ प्राप्तीसाठी उपलब्ध) ढोबळ प्राप्तीच्या ५०% दाखवत त्यांचे पेशावर उत्पन्न दाखल करू शकतात.


५. आयटीआर-५: एओपी (असोसिएशन ऑफ पर्सन्स), बीओआय (बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स), एलएलपी, सहकारी सोसायटी, एजीपी (आर्टिफिशिअल जुरीडीकल पर्सन) असलेले करदाते आणि स्थानिक प्राधिकरणांना त्यांचा प्राप्तीकर परतावा आयटीआर-५ मध्ये दाखल करायचा आहे.

६. आयटीआर-६: धर्मादाय किंवा धार्मिक उद्देशांसाठी धारण केलेल्या संपत्तीमधून झालेल्या उत्पन्नाचा दावा करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कॉर्पोरेट करदात्यांना त्यांचा प्राप्तीकर परतावा आयटीआर-६ मध्ये दाखल करायचा आहे.

७. आयटीआर-७: कलम १३९ (४ए) ते १३९ (४डी) अंतर्गत येणारे ट्रस्ट, बिगर-नफा संस्था, महाविद्यालये, गूंतवणूक फंड्स इत्यादींचा समावेश असलेल्या करदात्यांना त्यांचा प्राप्तीकर परतावा आयटीआर-७ मध्ये भरणं आवश्यक आहे.


- लेखक: अर्चित गुप्ता, संस्थापक आणि सीईओ, क्लिअरटॅक्सहेही वाचा-

का भरायचा इन्कम टॅक्स रिटर्न? जाणून घ्या कारण आणि फायदे

पर्सनल लोनला 'हे' आहेत पर्याय, नाही द्यावं लागणार अधिक व्याजसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा