SBI ची खातेदारांसाठी खूशखबर, किमान शिल्लक अट काढली

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक आॅफ इंडियाने (Sbi) आपल्या खातेदारांना मोठी खूशखबर दिली आहे. एसबीआयने बचत खात्यावर किमान मासिक रक्कम ठेवण्याची अट काढून टाकली आहे.

SBI ची खातेदारांसाठी खूशखबर, किमान शिल्लक अट काढली
SHARES

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक आॅफ इंडियाने (Sbi) आपल्या खातेदारांना मोठी खूशखबर दिली आहे. एसबीआयने बचत खात्यावर किमान मासिक रक्कम ठेवण्याची अट काढून टाकली आहे. त्यामुळे आता एसबीआयच्या ग्राहकांना खात्यात किमान रक्कम नसल्यास दंड आकारला जाणार नाही. एसबीआयने बुधवारी जाहीर केलेल्या निवेदनात याची माहिती दिली.

एसबीआयच्या या निर्णयाचा फायदा ४४,५१ कोटी ग्राहकांना होणार आहे. एसबीआयच्या बचत खाते असणाऱ्या खातेदारांना शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक होतं. जर किमान शिल्लक न ठेवल्यास एसबीआय अशा ग्राहकांना ५ ते १५ रुपयांचा दंड आकारते. मात्र, एसबीआयने बचत खात्यावर किमान मासिक रक्कम ठेवण्याची अट काढून टाकल्याने आता खातेदारांना दंड द्यावा लागणार नाही. 

ही घोषणा करताना एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले की, या घोषणेमुळे आमच्या मूल्यवान ग्राहकांच्या चेहऱ्यावरील हसू  आणखी वाढेल.  किमान शिल्लक ठेवण्याची अट काढून टाकणे हे बँकेचं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे जे ग्राहकांना अधिक सोयीस्कर आणि चांगल्या बँकिंग अनुभवासाठी उचलले गेले आहे. आम्हाला विश्वास आहे की यामुळे आमच्या ग्राहकांचा एसबीआयवरील विश्वास आणखी दृढ होईल.हेही वाचा -

संबंधित विषय