Advertisement

लस खरेदीसाठीच्या बीएमसीच्या जागतिक निविदेला ८ कंपन्यांचा प्रतिसाद

नवीन आलेल्या कंपन्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असल्याने त्यांना १ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लस खरेदीसाठीच्या बीएमसीच्या जागतिक निविदेला ८ कंपन्यांचा प्रतिसाद
SHARES

मुंबईत कोरोनावरील लसींचा (coronavirus vaccine) मोठा तुटवडा जाणवत आहे. परिणामी मुंबईतील लसीकरण मोहीम थंडावली आहे. मुंबईतील लसीकरण वेगाने व्हावे यासाठी मुंबई महापालिकेने १ कोटी लसीचे डोस खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा मागवल्या होत्या. या निविदेला ८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या कंपन्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.  त्यामुळेच या प्रक्रियेस १ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

८ संभाव्य पुरवठादारांपैकी ७ पुरवठादारांनी स्पुटनिक व्ही तर त्यातीलच एका पुरवठादाराने स्पुटनिक लाइट या कोविड लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे.  तर एका पुरवठादाराने अस्ट्राझेनका फायजर या लसीचा पुरवठा करण्यात स्वारस्य दाखविलं आहे.

कोरोना लस पुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने १२ मे रोजी जागतिक निविदा काढली होती. याला सोमवारी २४ मे पर्यंत पाच पुरवठादार कंपन्यांनी स्वारस्य दाखवले. मंगळवारी, २५ मे पर्यंत शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी आणखी तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. 

नवीन आलेल्या कंपन्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असल्याने त्यांना १ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. तसेच आणखी कोणाला प्रस्ताव सादर करावयाचा असल्यास संपूर्ण कागदपत्रांसोबतच पूर्ण प्रस्ताव सादर करावा लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादीत करीत असलेल्या कंपन्या या दोन्हीं दरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीपणे होईल, याची खात्री पटेल, तसेच नेमक्या किती दिवसात लस पुरवठा होईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या ४ मुख्य पैलूंचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.



हेही वाचा - 

आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती

COVID 19 रुग्ण शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, अभ्यासातून उघड

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा