Advertisement

वाट चुकल्याने बिबट्याचा बछडा आरे कॉलनीतील गुरांच्या गोठ्यात शिरला


वाट चुकल्याने बिबट्याचा बछडा आरे कॉलनीतील गुरांच्या गोठ्यात शिरला
SHARES

मुंबईच्या आरे काँलनीतील जंगलात रस्त्यावरील कुत्र्यांच्या शिकारीच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत शिरल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. अशाच वाट चुकलेल्या एका बिबट्याच्या बछडा मंगळवारी आरे काँलनीतील गुरांच्या गोठ्यात शिरला. बिबट्याचा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र सोशल मिडियावर वायरल होत आहे.

आरे काँलनीतील गुरांच्या गोट्यात बिबट्या शिरल्याचे वृत्त समजताच तेथील स्थानिकांमध्ये धडकी भरली. दरम्यान, भुकेलेला बिबट्याचा बछडा हा वाट चुकला आणि गुरांच्या गोट्यात आल्याचे सांगितले जाते.  भटक्या कुत्र्यांच्या शोधात या पूर्वीही या परिसरात बिबट्या आला असल्याचे बोलले जाते. गुरांच्या चारा खाण्यच्या दालनात बिबट्या पडला. बांधलेल्या जणांवरांवर स्वरक्षणासाठी गुरगुरत होता. बिबट्या गोट्यात शिरल्याचे समजताच नागरिकांनी आरडा ओरडा करण्यास सुरूवात केली. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. हा सर्व प्रकार एका व्यक्तीने त्याच्या मोबाइलच्या कॅमेऱ्याच कैद केला असून ती दृश्य आता सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात वायरल होत आहेत.

संबंधित विषय