Advertisement

कामगार भरतीची प्रश्नपत्रिका योग्यच, महापालिका आयुक्तांचा दावा

महापालिकेची कामगार भरती परीक्षा रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं वृत्त आहे. मात्र आयुक्त अजोय मेहता यांनी ही परीक्षा प्रक्रिया आणि त्यात विचारण्यात आलेले प्रश्न योग्य असल्याचं म्हटलं आहे.

कामगार भरतीची प्रश्नपत्रिका योग्यच, महापालिका आयुक्तांचा दावा
SHARES

मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या भरती परीक्षेमध्ये विचारलेल्या कठीण प्रश्नपत्रिकेवरून ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी होत आहे. किंबहुना ही परीक्षा रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं वृत्त आहे. मात्र आयुक्त अजोय मेहता यांनी ही परीक्षा प्रक्रिया आणि त्यात विचारण्यात आलेले प्रश्न योग्य असल्याचं म्हटलं आहे.

आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेत ९० पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची संख्या ३४ आहे. तर ८० ते ९० गुण मिळवलेल्या उमेदवारांची संख्या १५०० च्या आसपास आहे. प्रश्नपत्रिका कठीण असत्या, तर परीक्षार्थींना एवढे गुण मिळाले असते का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.


किती उमेदवार उत्तीर्ण?

महापालिका सभागृहातील अर्थसंकल्पीय चर्चेत निवेदन करताना आयुक्तांनी हा खुलासा केला. महापालिकेच्या १३८८ कामगारांच्या भरतीसाठी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेत अयोग्य प्रश्न विचारण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. परंतु तसं असतं, तर परीक्षेला बसलेल्या २ लाख ८७ हजार उमेदवारांपैकी १ लाख ६ हजार उमेदवार उत्तीर्ण झाले असते? का असा प्रश्न आयुक्तांनी केला.


तल्लख बुद्धीच्या उमेदवारासाठी

ही परीक्षा पारदर्शकपणे व्हावी, त्यात तल्लख बुद्धीच्या उमेदवारांची निवड करता यावी, म्हणून कठीण प्रश्न विचारण्यात आले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी ८० ते ९० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांची संख्या १५०० च्या आसपास आहे. तर ३४ उमेदवारांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत, असं आयुक्त म्हणाले.


आधीचा अनुभव पाहता...

यापूर्वी महापालिकेच्या खात्यामार्फत १३०० कामगारांच्या पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. यामध्येही लाखो उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु त्यावेळी घेतलेल्या परीक्षेत ६ हजारहून अधिक उमेदवारांना १०० पैकी १०० गुण मिळाले होते. म्हणूनच आधीच्या कामगार भरतीचा विचार करता अशाप्रकारची पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात आली.


कुणी केली मागणी?

भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी विधीमंडळात महापालिकेची कामगार भरती रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली.

भाजपाच्या या मागणीनंतर सभागृहनेते यशवंत जाधव यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात ही परीक्षाच रद्द करून नव्याने घेण्याची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे नक्की या भरती प्रक्रीयेचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.हेही वाचा-

मुंबई महापालिका चतुर्थ श्रेणी कामगार भरतीची प्रतीक्षा यादी काढणार नाही!

महापालिकेच्या १३८८ कामगारांच्या भरतीसाठी ३ लाख ६७ हजार अर्जRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा