Advertisement

राणीबागेत लवकरच परदेशी प्राण्यांचं आगमन!

राणीबाग परिसरालगत मफतलालच्या जागेवरील भूखंड महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर शुक्रवारी ही जागा अधिकृतपणे ताब्यात घेण्यात आली. गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महापालिकेने या जागेचा ताबा घेऊन त्याच्या वापराला सुरुवात केली.

राणीबागेत लवकरच परदेशी प्राण्यांचं आगमन!
SHARES

'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय' अर्थात राणीबाग परिसरालगत मफतलालच्या जागेवरील भूखंड महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर शुक्रवारी ही जागा अधिकृतपणे ताब्यात घेण्यात आली. गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महापालिकेने या जागेचा ताबा घेऊन त्याच्या वापराला सुरुवात केली. येत्या दोन वर्षांमध्ये या जागेत आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन तसंच आशियायी प्राण्यांचं नंदनवन फुलवण्यात येणार आहे.


किती जागा ताब्यात?

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय (राणीचा बाग) आहे. या उद्यानालगत सुमारे ५४ हजार ५६८.७२ चौरस मीटर आकाराचा भूखंड आहे. माझगाव विभागातील सीएस ५९३ क्रमांकाचा हा भूखंड मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने देण्यात आला होता.




निकाल महापालिकेच्या बाजूने

याबाबत महाराष्ट्र शासनाद्वारे वर्ष २००४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेआधारे व सदर भाडेपट्ट्याचा कालावधी वर्ष २०१७ मध्ये संपल्यानंतर; मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांद्वारे या भूखंडाच्या निम्मा अर्थात २७ हजार २८४.३६ चौरस मीटर एवढ्या आकाराचा भूभाग महापालिकेकडे वर्ग करण्याचे निर्देश ‘मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड’ देण्यात आले होते. प्रत्यक्षात ही जागा महापालिकेच्या ताब्यात कागदोपत्री असूनही मफललालने तो देण्यास नकार दिला होता. त्यावरून पुन्हा न्यायालयात वाद सुरु होता आणि हा निकाल महापालिकेच्या बाजूनं लागला.

न्यायालयाच्या आदेशानंतर २ दिवसांपूर्वी मफतलालमधील रस्ता बंद करून राणीबागेतूनच रस्ता खुला करण्यात आला. शुक्रवारी येथील सुरक्षा रक्षकांची झोपडी तोडून याठिकाणी विस्तारीत प्राणी संग्रहालय बनवण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.


प्रक्रिया जलदगतीने

अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शुक्रवारी राणीबागेतील या विस्तारीत प्राणी संग्रहालयासंदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन पुढील प्रक्रिया जलदगतीनं राबवण्याच्या सूचना सर्वांना दिल्या आहे. या विस्तारीत प्राणी संग्रहालयाच्या जागेवर आफ्रिकन सवाना, ऑस्ट्रेलियन, साऊथ आफ्रिकन आदी भागातील परदेशी प्राण्यांचं संग्रहालय बनवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली.




कुठल्या प्राण्यांचा समावेश?

सध्या जिराफ, झेब्रा, चिता, हिप्पोपॉटोमस, ऑस्ट्रीच, कांगारु, इमू, जग्वार आदी प्राणी या प्राणी संग्रहालयात आणले जातील, असं त्यांनी सांगितलं. येथील नैसर्गिक वातावरणाशी समरस होतील, असेच प्राणी याठिकाणी आणले जातील, असंही त्यांनी सांगितलं.


मास्टर प्लान तयार

या विस्तारीत प्राणी संग्रहालयाचा मास्टर प्लान केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाला पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे ही मंजुरी प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया राबवतानाच सर्वप्रकारची कागदोपत्री प्रक्रिया पुढील ४ महिन्यांमध्ये आटोपली जाईल. यामध्ये कोणते प्राणी आणणं शक्य आहे हे निश्चित करून निविदा प्रक्रिया राबवली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन २ वर्षांच्या आत या परदेशी प्राण्याचं दर्शन मुंबईकरांसह पर्यटकांना घेता येईल, असा विश्वास जऱ्हाड यांनी व्यक्त केला.


'हे' प्राणी असतील

आफ्रिकन : जिराफ, झेब्रा, चिता, हिप्पोपॉटोमस, लेमूर, ऑस्ट्रीच,
ऑस्ट्रेलियन विभाग : कांगारु, वालाबी, इमू आणि ब्लॅक स्वान
दक्षिण आफ्रिकन विभाग : जग्वार
दक्षिण पूर्व आशिया विभाग : टापीर, होलॉक, गीब्बान
प्रिमेट आयलंड. चिम्पांझी, रिषस, आणि बॉनेट मॅकक
फ्लेमिंगो



हेही वाचा-

पेंग्विनच्या देखभालीसाठी वर्षाला साडेचार कोटींचा खर्च

विस्तारीत राणीबागेच्या भूखंडाची याचिका रद्द; मफतलाल कंपनीला दणका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा