Advertisement

बाप्पावरही जीएसटी, गणेशमूर्ती महागल्या!


बाप्पावरही जीएसटी, गणेशमूर्ती महागल्या!
SHARES

गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही बाप्पाच्या मूर्तींच्या किंमतीत १५ ते १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बाप्पाच्या मूर्त्या तयार करण्यासाठी जास्तीत जास्त साहित्यांची आवश्यकता असते. मात्र, या साहित्यांवर जीएसटी लागल्यामुळं गणेश मूर्ती घडवण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळं यंदाही गणेश मूर्तींच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र, याचा मोठा फटका मूर्तीकारांसह ग्राहकांना बसणार आहे.


बाप्पांच्या अागमनाचे वेध 

महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा. गणेशाच्या आगमनासाठी घराघरांमध्ये तसंच गणेश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी सुरु झाली आहे. तसंच मुंबईसह राज्यभरातील जनतेला आता गणपती बाप्पांच्या अागमनाचे वेध लागले आहेत. अवघ्या दोन महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून परळच्या सेंट्रल रेल्वे वर्कशॉपमध्ये मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.


वस्तूंवर जीएसटी 

दरवर्षी या कारखान्यात एकूण ३०० ते ३५० पेक्षा अधिक मूर्त्या घडवल्या जातात. तसंच प्रत्येक मूर्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रभावळ देखील तयार केली जाते. प्रभावळ तयार करताना अतिशय रेखीव कोरीवकाम, सुबक नक्षीकाम केलं जातं. या कामासाठी देखील आवश्यक वस्तूंची गरज असते. मात्र, या वस्तूंवर देखील जीएसटी लागू झाला आहे.



गणेशमूर्ती घडवण्यासाठी लागणारे पीओपी, रंगबेरंगी रंग आणि इतर वस्तू यांवर जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळं गणेशाच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. आम्ही दरवर्षी ६ ते ७ फुटांपासून २० ते २२ फुट उंचीच्या गणेश मूर्त्या निर्माण करतो. या मूर्त्यांची किंमत १० हजार रुपयांपासून लाखापर्यंत असते. त्याचप्रमाणं प्रत्येक गणेश मंडळांच्या देखाव्यानुसार त्यांच्या गणेश मुर्तींची मागणी दरवर्षी बदलते. त्यानुसार गणेश मुर्तींची किंमत ठरवली जाते.
- कुणाल पाटील, मूर्तीकार



हेही वाचा -

शेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेमाचा नायक

मुंबईकरांच्या पाण्याची चिंता दूर, तलाव भरले तुडुंब



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा