Advertisement

गोकुळकडून दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

सर्व सामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे. दुधाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

गोकुळकडून दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर
SHARES

सर्व सामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे. दुधाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. म्हशीच्या दुधाच्या दरात दोन रुपये प्रतिलीटर, तर गाईच्या दुधाच्या दरात एक रुपये प्रतिलीटर वाढ करण्याचा निर्णय गोकुळ दूध संघाने (Gokul milk union) घेतला आहे.

पशूखाद्य तसेच जनावरे सांभाळण्याचा खर्च वाढला. या पार्श्वभूमीवर दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबईत म्हशीच्या एक लीटर दुधासाठी 66 रुपये मोजावे लागतील. आधी म्हशीचे दूध प्रतिलीटर 64 रुपये होता. या वाढीव दराचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

गाईच्या दुधाच्या दरात प्रतिलीटर एक रुपये वाढ करण्यात आली. म्हशीच्या दरात दोन रुपये प्रतिलीटर वाढ करण्यात आली. याचा फायदा दूध उत्पादक शेतकरी तसेच गोकुळ दूध संघालाही होणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशातून प्रतीलीटर एक ते दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

गोकुळने दरवाढ केली असली तर इतर दूध संघांनी ही दरवाढ केलेले नाही. त्यामुळं इतर दूध संघाचे दुधाचे दर तेच राहतील. फक्त गोकुळ दूध संघानं ही दरवाढ केली आहे. त्यामुळं फक्त गोकुळच्या दूध दरात वाढ झाली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, हॉटेल्स आणि व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने, आईस्क्रीम, लोणी, चीज, ताक आणि दही यांच्या मागणीत मोठी वाढ झाली. शिवाय ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम राजस्थान आणि गुजरात सारख्या म्हशीच्या दुधाचे उत्पादन करणार्‍या राज्यांमध्ये दिसून येत आहे. काही प्रमाणात तुटवडा आहे. परिणामी खरेदी कमी झाली आहे. या मागणी-पुरवठ्याच्या विसंगतीमुळे किंमती वाढल्या आहेत."

केंद्राने वस्तूंवर ५% जीएसटी लादल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळने आतापर्यंत दही, लस्सी आणि ताक यांच्या एमआरपीमध्ये वाढ केलेली नाही, परंतु ही वाढ लवकरच होऊ शकते. याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे अधिकारी म्हणाले.

सोमवारपासून नवे दर लागू होणार असल्याची माहिती गोकुळ डेअरीचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी कोल्हापुरात दिली. "पशु चाऱ्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दुग्ध उत्पादकांना पशुपालन परवडणे कठीण होत आहे. त्यामुळे दुग्धोत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी संचालक मंडळाने म्हशी आणि गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. म्हशीच्या दुधाच्या विक्री दरातही वाढ करण्यात आली असून, जिल्ह्यातील सुमारे 5.5 लाख दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दरमहा साडेचार कोटी रुपयांचा फायदा होणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.



हेही वाचा

घोडबंदर मार्गावर १० ऑगस्टपर्यंत वाहतूकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा