Advertisement

गोकुळ दुधाचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या नवे दर

नवीन दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे

गोकुळ दुधाचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या नवे दर
SHARES

सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका बसला आहे. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत असताना दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) (मुंबई गोकुळ मिल्क PRICE) ने दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.

गोकुळने गायीच्या दुधाच्या दरात अर्धा लिटरमागे ३ आणि २ रुपयांनी वाढ केली आहे. अशाप्रकारे गोकुळचे दूध ५४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. दरम्यान, आजपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

दुधाच्या दरात या वाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र पुन्हा एकदा दुधाच्या दरात नव्याने वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गोकुळच्या दुधाच्या दरात ही वाढ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी माध्यमांमध्ये जाहिरात दिली आहे. दरम्यान, गोकुळ ब्रँडच्या फुल क्रीम दुधाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

गोकुळ दूध संघाने गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा गायीच्या दुधाच्या दरात वाढ केली आहे. देशात दुधाचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्था आणि खासगी दूध संघांनी गाय आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ केली होती.

27 ऑक्टोबर रोजी गोकुळने गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. मात्र विक्री दरात वाढ झाली नाही.

वाढीव दराने दूध खरेदी करून जुन्या दराने विक्री केल्याने झालेल्या नुकसानीमुळे संचालक मंडळाने सोमवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून विक्री दरात तीन रुपयांची वाढ केली आहे. हा दर मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड या ठिकाणी लागू असेल.



हेही वाचा

३ किलोमीटरची पायपीट वाचणार, माथेरानमध्ये ई रिक्षा धावणार

Section 144 Imposed: मुंबईत शाळा, महाविद्यालये बंद राहतील की सुरू?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा