Advertisement

मंत्रिमंडळाच्या बैठकिनंतर मास्कसक्ती बद्दल राजेश टोपे म्हणाले...

राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांसदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

मंत्रिमंडळाच्या बैठकिनंतर मास्कसक्ती बद्दल राजेश टोपे म्हणाले...
SHARES

राज्यात अद्याप मास्कसक्ती करण्यात आली नाही, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनावर चर्चा करण्यात आली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, सरकार परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून आहे. तूर्तास मास्क वापराची सक्ती करण्यात आली नाही. मास्कचा वापर न केल्यास दंडही ठोठावण्यात येणार नाही. मात्र, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर स्वइच्छेनं करावा असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांसदर्भात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मास्कच्या विषयावर चर्चा झाली. नागरिकांमध्ये मास्क लावण्यासंदर्भात जनजागृती करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारनं महाराष्ट्रात मास्कमुक्तीची घोषणा केली होती. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र कोरोनाची वाढती संख्या पाहता कोविड टास्क फोर्सनं चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे.

आपल्याला कोरोना व्हायरस सोबत जगावं लागेल, आपलं दैनंदिनी काम करावं लागेल, त्यामुळे कुठेही घाबरून जायचं किंवा किंवा पॅनिक व्हायचं कारण नाही असं मत राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केलं आहे.



हेही वाचा

गुड न्यूज! आता मुंबईकरांना 'या' केंद्रावर मोफत बुस्टर डोस मिळण्याची शक्यता

६ ते १२ वयोगटातील मुलांचं 'या' तारखेपासून होणार लसीकरण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा