Advertisement

‘हे’ १५ जिल्हे वगळता महाराष्ट्रात १ जूनपासून लाॅकडाऊन शिथिल?

महाराष्ट्रात रेड झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांव्यतीरिक्त १ जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘हे’ १५ जिल्हे वगळता महाराष्ट्रात १ जूनपासून लाॅकडाऊन शिथिल?
SHARES

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. यामुळे राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनची मुदत ३१ मे नंतर संपत असल्याने आणि दुकानदारांकडून व्यवसाय सुरू करण्याची मागणी जोर धरत असल्याने महाराष्ट्रात (maharashtra) रेड झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांव्यतीरिक्त १ जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक इ. जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे १ जूनपासून निर्बंध शिथिल होणार की नाही असे प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात घोळू लागले आहेत. त्यातच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात रेड झोन असलेल्या १५ जिल्ह्यांना वगळता इतर ठिकाणी नियम शिथिल करण्यात येणार असल्याचे संकेत दिले. यावर येत्या ३ ते ४ दिवसांत निर्णय होऊ शकतो.

‘हे’ जिल्हे रेड झोनमध्ये

अहमदनगर, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, अकोला, वाशीम, बीड, गडचिरोली असे हे रेड झोनमध्ये येणारे जिल्हे आहेत.

सोबतच कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यानुसार १ जूनपासून काही जिह्यातील निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. टोपे यांच्या वक्तव्यानंतर राज्यात जिल्हानिहाय लाॅकडाऊन सुरू राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा- उद्धव ठाकरे

'असं' होईल शिथिलीकरण

तसं झाल्यास राज्यात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असेल तिथं कडक लाॅकडाऊन सुरूच राहील. तर ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली असेल, तिथं काही निर्बंध टप्प्याटप्प्यांत शिथिल करण्यात येतील. एखाद्या जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग कमी झाला आहे किंवा नाही, याचा आढावा घेऊन, संबंधित जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्याचा वा काढण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल.

जिल्हाबंदी सध्या तरी कायम राहण्याची शक्यता आहे. १ जून नंतर सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो. दुकानदारांसाठी हा निर्णय काही प्रमाणात दिलासा ठरू शकेल. कोरोना (coronavirus) आटोक्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकान उघडी ठेवण्यास सुद्धा परवानगी देण्यात येऊ शकते. धार्मिक स्थळे यापुढंही बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. सोबतच मुंबईतील लोकल सेवा देखील सर्वसामान्यांसाठी बंदच राहू शकते. 

हेही वाचा- COVID 19 रुग्ण शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, अभ्यासातून उघड

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा