तर, मुंबईतील भाजीमंडई बंद करू, महापौरांनी दिला शेवटचा इशारा

लाॅकडाऊनमध्येही नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन नागरिकांना वारंवार केलं जात आहे. मात्र, तरीही मुंबईतील रस्त्यावरील अनावश्यक गर्दी होत आहे.

तर, मुंबईतील भाजीमंडई बंद करू, महापौरांनी दिला शेवटचा इशारा
SHARES

लाॅकडाऊनमध्येही नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन नागरिकांना वारंवार केलं जात आहे. मात्र, तरीही मुंबईतील रस्त्यावरील अनावश्यक गर्दी होत
आहे. भाजीमंडईतील गर्दी अद्यापही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजाने भाजीमंडई बंद करावी लागेल, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

मुंबईत भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेते आणि खरेदीदारांची रोज मोठी गर्दी होते. यातून कोरोना विषाणू आणखी फैलावण्याची भिती आहे. कोरोना संकटाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग खूर महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात राहणे गरजेचे असल्याचे महापौर यांनी सांगितले. धारावी सारख्या झोपडपट्टी भागात कोरोनाने शिरकाव केल्याने महापालिका प्रशासन सावध झाले आहे. रतन टाटा हे आज देवताचे रूप आहे. टाटा यांनी त्यांच्या मालकीची मुंबईतील  हॉटेल्स आणि महाविद्यालये क्वॉरंटाईनसाठी दिली आहे. गरज पडल्यास शाहरुख खानचे कार्यालय देखील क्वॉरंटाईनसाठी वापरले जाईल, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.

मुंबई महापालिकेने कोरोनाने मृत्यू झालेल्या मृताचे मृतदेह जाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, मुस्लीम नेत्यांच्या दबावानंतर हा निर्णय मागे घ्यावा लागला. यावर मुस्लीम नेत्यांनी अशा संकटकाळात मतांचे राजकारण न करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. पालिकेच्या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याची माहितीही त्यांनी दिली.हेही वाचा -

लॉकडाऊनमुळं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय, काॅल करा 'ह्या' क्रमांकावर

हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक, मात्र ग्राहक नाही

कोरोनाग्रस्ताच्या घरातून पोपटाची सुखरूप सुटका
संबंधित विषय