Advertisement

नायर रुग्णालयाच्या कोविड वार्डमध्ये पाणी शिरले

रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे साचलेले पाणी नायर रुग्णालयाच्या कोविड वार्डात गुडघाभर साचले. त्यामुळे रुग्णांसह डाँक्टरांची तारांबळ उडाली.

नायर रुग्णालयाच्या कोविड वार्डमध्ये पाणी शिरले
SHARES

मुंबईच्या हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार काल रात्रीपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर इतका होता की, मुंबईच्या अनेक सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचले. मात्र रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे साचलेले पाणी नायर रुग्णालयाच्या (Nair Hospital) कोविड वार्डात गुडघाभर साचले. त्यामुळे रुग्णांसह डाँक्टरांची तारांबळ उडाली.


 देशावर कोरोनाचं संकट असताना मंगळवारी रात्री पावसाच्या कहरामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गुडघाभऱ पाणी साचल्याने नागरिकांना रुग्णालयात येणं व बाहेर जाणं अवघड झालं होतं. हे पाणी नायर रुग्णालयातील कोविड वार्ड (COVID Center )मध्ये शिरल्याने डाॅक्टरांसह रुग्ण रात्रभर गुडघाभर पाण्यात होते. वार्डातील उपचाराची साहित्य, कचऱ्याचे डब्बे हे त्या पाण्यात तरंगत होते. अशा प्रकारे नायर रुग्णालयात पाणी साचण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.  यातून संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर पालिकेने तातडीने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. येत्या २४ तासांत मुंबईत मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचाः- लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान झालेल्या वडापाव विक्रेत्याने केली आत्महत्या

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. मुंबईत ठिक ठिकाणी पाणी साचल्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरील वाहतूक ही इतर मार्गांवर वळवण्यात आलेली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा