Advertisement

मुंबईत ५२७ नवे कोरोना रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, अद्याप रुग्णसंख्या ही वाढत आहे.

मुंबईत ५२७ नवे कोरोना रुग्ण, ६ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, अद्याप रुग्णसंख्या ही वाढत आहे. बुधवारी मुंबईत ५२७ नवे करोना रुग्ण आढळले असून, ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी नव्यानं सापडलेल्या कोरोना रुग्णांमुळं बाधितांची एकूण संख्या ७ लाख ४२ हजार ५३८ झाली आहे. तर ४०५ रुग्ण बरे झाल्यानं कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ लाख १९ हजार २१८ झाली आहे. सध्या मुंबईत ४ हजार ७२४ उपचाराधीन रुग्ण आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी ३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३ पुरुष व ३ महिलांचा समावेश आहे. 

राज्यात दिवसभरात ३१८७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर ४९ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ३२५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ३६ हजार ६७५ इतकी आहे. गेल्या २४ तासांत रायगड ९४, पनवेल ६३,  नाशिक ७८, नाशिक शहर ६०, अहमदनगर ५६१, पुणे ३४१, पुणे शहर २००, पिंपरी-चिंचवड १०७, सोलापूर १७०, सातारा १९७, सांगली ८६, सिंधुदुर्ग ३१, रत्नागिरी ५९, उस्मानाबाद ३४, बीड ३४ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या २४ तासांत १८,८७० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळं करोनाबाधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी २० हजारांच्या खाली राहिलेली आहे. याच काळात करोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २,८२,५२० पर्यंत घसरली असून, गेल्या १९४ दिवसांतील उपचाराधीन रुग्णांची ही सर्वात कमी संख्या आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा