Advertisement

महापालिकेतील १३८८ पदांच्या भरतीसाठी सोमवारपासून ऑनलाईन अर्ज

मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या १३८८ जागा भरण्यासाठी येत्या सोमवारी ११ डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून ३१ डिसेंबरपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहे.

महापालिकेतील १३८८ पदांच्या भरतीसाठी सोमवारपासून ऑनलाईन अर्ज
SHARES

मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या १३८८ जागा भरण्यासाठी येत्या सोमवारपासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. येत्या सोमवारी ११ डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून ३१ डिसेंबरपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर अखेर उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे.


कुठे कराल अर्ज?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज http:// porter.mcgm.gov.in या किंवा mcgmlabourrecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. (टीप: वर दिलेली संकेतस्थळे बुधवारीच सुरू होतील)


कोणत्या पदांसाठी भरती?

मुंबई महापालिकेचे जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण आदी अत्यावश्यक विभागांमध्ये कामगारांची पदे रिक्त असून या सर्व विभागांत कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार आदी वर्गांतील १३८८ रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.


कोणत्या वर्गासाठी किती जागा?


प्रवर्गजागा
खुला प्रवर्ग५०४
अनुसूचित जाती२२३
अनुसूचित जमाती१०८
विमुक्त जाती४८
भटक्या जमाती ब३४
भटक्या जमाती क५१
भटक्या जमाती ड३२
विशेष मागासवर्ग३२
इतर मागासवर्ग (ओबीसी)३५६
एकूण१३८८


पात्रता निकष

शिक्षण - किमान दहावी मराठी विषयासह उत्तीर्ण

पुरूष -

किमान वजन - ५० कि.ग्रॅ.
किमान उंची - १५७ सेंटीमीटर

महिला -

किमान वजन - ४५ कि.ग्रॅ.
किमान उंची - १५० सेंटीमीटर

महत्वाची सूचना: महापालिकेतील या कामगार भरतीशी 'मुंबई लाईव्ह'चा कोणताही संबंध नसून या भरतीची माहिती इच्छुकांपर्यंत पोहोचवण्याचे काम 'मुंबई लाईव्ह'च्या माध्यमातून केले जात आहे. या भरतीसंदर्भात दिलेल्या पोर्टलवर आपण नोकरभरतीसंबंधीचा अर्ज भरु शकता.


ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज सुरु : सोमवार ११ डिसेंबर २०१७
ऑनलाईन अर्जांची शेवटची तारीख : रविवार ३१ डिसेंबर २०१७ (२३.५९ वाजेपर्यंत)
'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या शाखेत शुल्क स्वीकारण्याचा कालावधी : ११ डिसेंबर २०१७ ते १ जानेवारी २०१८
ऑनलाईन परिक्षेसाठी प्रवेशपत्र मिळण्याची तारीख : १५ जानेवारी २०१८
ऑनलाईन परीक्षा : फेब्रुवारी महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा
उमेदवारांना परीक्षेत मिळालेल्या गुणांबाबतची माहिती : फेब्रुवारी महिन्याचा चौथा आठवडा
अंतिम निवड यादी : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा



हेही वाचा

मुंबई महापालिकेत १३८८ चतुर्थ श्रेणी जागांची महाभरती!

मुंबई महापालिका चतुर्थ श्रेणी कामगार भरतीची प्रतीक्षा यादी काढणार नाही!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा