Advertisement

वसई विरारमधील रहिवाशांना 'ही' प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन, अशी आहे प्रक्रिया

वसई विरार महानगरपालिकेच्या (vvcmc) अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

वसई विरारमधील रहिवाशांना 'ही' प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन, अशी आहे प्रक्रिया
SHARES

वसई विरार महानगरपालिकेच्या रहिवाशांना आता मृत्यू आणि जन्म प्रमाणपत्रांसह अनेक महत्त्वाची कागदपत्र ऑनलाईन मिळतील. वसई विरार महानगरपालिकेच्या (vvcmc) अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही कागरपत्र आणण्यासाठी तुम्हाला आता घराबाहेर पडण्याची काही आवश्यक्ता नाही.

खालील प्रमाणपत्र vvcmc वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात. वसई विरार महानगरपालिकेच्या या आदेशामुळे जनतेची अनेक कामं सहज होण्यास मदत मिळेल. विशेष करून कोरोनाव्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये याचा अधिक फायदा होईल.

कोणती प्रमाणपत्रे डाउनलोड करता येतील?

  • विवाह प्रमाणपत्र फॉर्म
  • मूल्यांकन प्रमाणपत्र फॉर्म
  • थकबाकी प्रमाणपत्र
  • झोन प्रमाणपत्र फॉर्म
  • जन्म नोंदणी फॉर्म
  • मृत्यू नोंदणी फॉर्म
  • फायर NOC - रुग्णालयाचा फॉर्म
  • फायर NOC - व्यवसाय फॉर्म
  • विक्रीद्वारे मालमत्ता हस्तांतरण
  • नामनिर्देशित व्यक्तीद्वारे मालमत्तेचे हस्तांतरण
  • पाणी कनेक्शन फॉर्म
  • जाहिरात परवानगी

ऑनलाइन प्रमाणपत्रासाठी काय करावे?

  • सेवा वापरण्यासाठी प्रथम ऑनलाईन VVCMC च्या onlinevvcmc.in या वेबसाईटवर नोंदणी करणं आवश्यक आहे.
  • ईमेल आयडीवर नोंदणी केल्यानंतर आपल्याला प्राप्त झालेल्या नोंदणी लिंकसह आपले खाते सुरू करा
  • OTP साठी मोबाईल नंबर द्या. OTP चा मेसेज तुमच्या मोबाईल येईल.
  • पुढील प्रक्रियेसाठी लॉगइन करा
  • अर्ज डाउनलोड करा आणि आवश्यक कागदजत्र तपशील काळजीपूर्वक वाचा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.  कागदपत्र PDF स्वरूपात असणx आवश्यक आहे
  • नेट बँकिंग / क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करुन ऑनलाईन पैसे भरा.
  • VVCMC नियुक्तीची तारीख जाहीर करेल.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा