Advertisement

खुशखबर : एलपीजी सिलेंडर १२० रुपयांनी स्वस्त

नवीन किमती १ जानेवारीपासून लागू होणार असल्याचं इंडियन ऑयल कार्पोरेशनने म्हटलं अाहे. डिसेंबर महिन्यात दोन वेळा सिलेंडरचे भाव कमी झाले अाहेत. १ डिसेंबर रोजी अनुदानित सिलेंडरच्या दरात ६.५२ रुपयांची कपात करण्यात अाली होती. याअाधी सलग ६ महिने सिलेंडरचे भाव वाढत होते.

खुशखबर : एलपीजी सिलेंडर १२० रुपयांनी स्वस्त
SHARES

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच केंद्र सरकारने खुशखबर दिली अाहे. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर १२०.५० रुपयांनी स्वस्त झाला अाहे. तर अनुदानित सिलेंडरच्या दरातही ५.९१ रुपयांची कपात झाली अाहे. अाता विनाअनुदानित सिलेंडर ६८९ रुपयांना मिळेल. याअाधीही ही किंमत ८०९.५० रुपये होती. तर अनुदानित सिलेंडर ४९४.९९ रुपयांमध्ये मिळणार अाहे. 


२ वेळा कपात

नवीन किमती १ जानेवारीपासून लागू होणार असल्याचं इंडियन ऑयल कार्पोरेशनने म्हटलं अाहे.  डिसेंबर महिन्यात दोन वेळा सिलेंडरचे भाव कमी झाले अाहेत. १ डिसेंबर रोजी अनुदानित सिलेंडरच्या दरात ६.५२ रुपयांची कपात करण्यात अाली होती. याअाधी सलग ६ महिने सिलेंडरचे भाव वाढत होते. डिसेंबरमध्ये दोन वेळा कपात केल्यामुळे अनुदानित सिलेंडर १४ रुपयांनी स्वस्त झाला अाहे. तर जून ते नोव्हेंबर या कालावधीत सिलेंडरच्या दरात १४ रुपये वाढ झाली होती. 


अांतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त

इंडियन ऑईल कार्पोरेशनने दरात कपात करताना म्हटलं की, अांतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतीत घट झाल्याने अाणि डाॅलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात १२०.५० रुपयांची कपात केली अाहे. याअाधी १ डिसेंबरला विनाअनुदानित सिलेंडर १३३ रुपयांनी स्वस्त झाला होता. 



हेही वाचा -  

के थोडी-थोडी पिया करो... नव्या वर्षात विदेशी मद्य महागणार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा