Advertisement

२१ रुग्ण सापडल्याने नेपीयन्सी रोडवरील ताहनी हाइट्स सील

मलबार हिल येथील नेपीयन्सी रोडवरील ताहनी हाइट्स या इमारतीत ७ दिवसांमध्ये २१ कोरोनाचे रूग्ण सापडल्याने ही इमारत महापालिकेने सील केली आहे.

२१ रुग्ण सापडल्याने नेपीयन्सी रोडवरील ताहनी हाइट्स सील
SHARES

मलबार हिल येथील नेपीयन्सी रोडवरील ताहनी हाइट्स या इमारतीत ७ दिवसांमध्ये  २१ कोरोनाचे रूग्ण सापडल्याने ही इमारत महापालिकेने सील केली आहे.  रुग्णांना कोरोना केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

ताहनी हाइट्स मधील विविध घरांमध्ये घरकाम करणाऱ्या १९ महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकांमध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. घरकाम करणाऱ्या महिलांमुळे अनेक जणांना संसर्ग झाला असण्याची भिती आहे. संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी पालिकेने इमारत सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोसायटीतील सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून चार ते सहा वेळा निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. सोसायटीला त्यासाठी तयारी करेपर्यंत पालिका हे निर्जंतुकीकरणाचे काम करणार आहे. सोसायटीतील सर्व रहिवाशांची तपासणी करण्यात आली आहे.


हेही वाचा -

सोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली

दारू पिण्याच्या परवानगीसाठी ‘इतक्या’ जणांनी केले अर्ज




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा