Advertisement

कोरोनामुळे भीमा-कोरेगावचा तपासही स्थगित, ६ महिन्यांची वाढीव मुदत मागितली

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे ​भीमा-कोरेगावचा​​​ (bhima koregaon inquiry committee) तपास करणाऱ्या आयोगाने हा तपास पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचं ठरवलं आहे.

कोरोनामुळे भीमा-कोरेगावचा तपासही स्थगित, ६ महिन्यांची वाढीव मुदत मागितली
SHARES

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे भीमा-कोरेगावचा (bhima koregaon inquiry committee) तपास करणाऱ्या आयोगाने हा तपास पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचं ठरवलं आहे. शिवाय या तपासाला ६ महिन्यांची मुदत वाढवून देण्याची मागणी देखील राज्य सरकारकडे केली आहे.

पुण्यातील भीमा कोरेगाव इथं २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने कोलकता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग (enquiry committee) नेमला होता. या आयोगाला गृहमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच २ महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

हेही वाचा- भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी शरद पवारांचीही होणार चौकशी

मुख्य सचिवांना पत्र

या आयोगाने राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास थांबवत असल्याची माहिती दिली आहे. आयोगाचे सचिव व्ही. व्ही. पलटणीकर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याने राज्य सरकारने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आयोग आपला तपास पूर्ण करण्यास असमर्थ आहे. त्यामुळे इतक्यात तरी आयोगाचा अंतिम अहवाल तयार करता येणार नाही. 

मुदत वाढवा

या पत्रात पुढे म्हटलं आहे की, या प्रकरणांतर्गत आयोगाला काही पोलीस अधिकारी, राजकीय नेते आणि इतर ४० ते ५० जणांची साक्ष घ्यायची आहे. त्याकरीता आणखी ६ महिन्यांचा कालावधी तरी आवश्यक आहे. असं म्हणत आयोगाने किमान ६ महिन्यांची मुदत वाढवून मागितली आहे.  

शरद पवारांना समन्स

चौकशी आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना समन्स (summon ) पाठवून ४ एप्रिल रोजी आयोगापुढं हजर राहून आपली साक्ष नोंदवास सांगितलं होतं. भीमा-कोरेगाव (Bhima koregaon) हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोकं स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्यांमध्ये कोणतीही कटुता नव्हती. मात्र, संभाजी भिडे (sambhaji bhide), मिलिंद एकबोटे (milind ekbote) यांनी आजुबाजूच्या खेड्यात फिरुन वेगळं वातावरण निर्माण केल्याचं शरद पवार म्हणाले होते. 

हेही वाचा-

आयोगाला अधिकार

हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी बोलवणं, कोणत्याही स्थळी वा इमारतीत कोणतीही कागदपत्रे जप्त करण्यासाठी प्रवेश करणं अथवा प्रवेशासाठी कुणाला प्राधिकृत करणं आदी अधिकार या समितीला देण्यात आले आहेत.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा