Advertisement

भारताच्या हाती तंबुरा, अमेरिकेनं खरेदी केला कोरोनावरील औषधाचा ग्लोबल स्टॉक

अमेरिकेनं या औषधाचा संपूर्ण स्टॉक खरेदी केला आहे. त्यामुळे अतर देशांना हे औषध मिळणं कठिण झालं आहे.

भारताच्या हाती तंबुरा, अमेरिकेनं खरेदी केला कोरोनावरील औषधाचा ग्लोबल स्टॉक
SHARES

जगभरात कोरोनाव्हायरसच्या (coronavirus Update) रुग्णांचा आकडा वाढत आहे. अनेक देश कोरोनावर लस बनवत आहेत. पण अद्याप कुणाला यश आलेलं नाही. त्यामुळे इतर आजारांवरील काही औषधं कोरोनाव्हायरसवर दिले जात आहेत. ही औषधं रुग्णांवर प्रभावी देखील ठरत आहेत. असंच एक औषध म्हणजे रेमडेसिवीर (Remdesivir).

रेमडेसिवीर औषध प्रभावी ठरत असल्यानं त्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे या औषधाची मागणी देखील वाढली आहे. सर्वच देशांना या औषधाची आवश्यक्ता आहे. असं असताना देखील अमेरिकेनं या औषधाचा संपूर्ण स्टॉक खरेदी केला आहे. त्यामुळे अतर देशांना हे औषध मिळणं कठिण झालं आहे.

अमेरिकेनं या औषधाचा ग्लोबल स्टॉक खरेदी केला आहे. यूएस डिपार्टमेंड ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेजमार्फत ५ लाखांपेक्षा जास्त औषधांचे डोस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

सुरुवातीला जगभरात या औषधाचे १ लाख ४० हजार डोस पुरवण्यात आले. आता अमेरिकी सरकानं ५ लाख डोसेस खरेदी केले. ५ लाख डोसेस म्हणजे जुलैमधील पूर्ण उत्पादन आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील ९० टक्के इतकं उत्पादन अमेरिकेनं आधीच खरेदी केलं. 

अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा सचिव अॅलेक्स अजार यांनी सांगतिलं, राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या नागरिकांसाठी सर्वात आधी करार केला आहे. अमेरिकेतल्या कोणत्याही नागरिकाला रेमडेसिवीर गरज असेल तर ती त्याला सहजरित्या उपलब्ध व्हावी, हाच आमचा उद्देश आहे. ट्रम्प सरकार कोरोनाविरोधात आवश्यक उपचार आणि अमेरिकन नागरिकांच्या उपचारासाठी सदैव तत्पर आहे.

रेमडेसिवीर हे अँटिव्हायरल औषध आहे. अमेरिकेतल्या गिलियड सायन्स (Gilead Sciences) कंपनीचं हे औषध आहे. इबोलाशी लढण्याासाठी हे औषध वापरण्यात आलं होतं. या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरा होत असल्याचा दावा केला जातोय.

यूएस नॅशनल हेल्थ इन्स्टिट्युटमार्फत करण्यात आलेल्या अभ्यासात कोरोना रुग्णांवर या औषधाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. त्यानंतर यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने या औषधाचा कोरोना रुग्णांवर आपात्कालीन उपचारासाठी वापर करण्यास मंजुरी दिली. भारतातही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपत्कालीन वापरासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली आहे.हेही वाचा

खासगी रुग्णवाहिकांकडून होणारी लूट आता थांबणार, खासगी रुग्णवाहिका शासन ताब्यात घेणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा