Advertisement

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद

मुंबईतल्या ३ वेगवेगळ्या भागात या दिवशी पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
SHARES

के/पूर्व आणि के/पश्चिम विभागांमधील काही परिसरात ६ आणि ७ ऑक्टोबरला पाणीपुरवठा होणार नाही. तर काही भागांमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होईल.

मुंबई महानगरपालिकेतर्फे के/पूर्व विभागात, जोगेश्वरी (पूर्व) येथे महाकाली गुंफा मार्गावर नंदभवन इंडस्ट्रीजजवळ वर्सोवा आऊटलेट या जलवाहिनीवर दुरुस्तीचे काम घेण्यात आले आहे.

याचा परिणाम पाणीपुरवठेवर होणार आहे. बुधवारी, ६ ऑक्टोबरला सकाळी १० पासून ७ ऑक्टोबरला सकाळी १० पर्यंत पाणीपुरवठा नसेल. 

तर माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी परळ आणि नायगावला प्रतिबंधित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागेल. ५ ऑक्टोबर सकाळी १० ते ६ ऑक्टोबर सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित असेल.

'या' मार्गावरील पाणीपुरवठा खंडित

  • व्ही. पी. मार्ग 
  • जुहू गल्ली 
  • उपासना गल्ली 
  • स्टेशन मार्ग 

वरील ठिकाणी पहाटे ३.३० ते सकाळी ८.३० पर्यंत पाणीपुरवठा खंडित राहिल. तर गिल्बर्ट हील इथं सकाळी ८.३० ते ११.१५ वाजेपर्यंत पाणी पुरवठा खंडित राहील. या दिवशी सकाळी ६.३० ते ९ या वेळेत एच पश्चिम विभागात कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. 

जुहू कोळीवाडय़ात सकाळी १० ते दुपारी १२.१५, चार बंगला इथं दुपारी १२.१५ ते २.१०, मोरागाव आणि पार्ला सप्लाय येथे दुपारी २.२३ ते ४.५५ या वेळेत कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. पार्ला आऊटलेट इथं दुपारी ४.३० ते संध्याकाळी ७.५०, एन. एस. फडके  मार्ग, पूर्ण विलेपार्ले पूर्व भाग इथं संध्याकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत पाणीपुरवठा खंडित राहील. 

रिलायन्स मोगरा, जुना नागरदास मार्ग, नवीन नागरदास मार्ग, मोगरापाडा रात्री ८ ते १०.३० या वेळेत कमी दाबानं पाणी पुरवठा होईल.



हेही वाचा

'त्या' मार्गावर होणार कुलाबा-सीप्झ मेट्रोची चाचणी

वरळीत उभारलं जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं मत्स्यालय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा