अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालयाला जुगार सट्टेबाजीप्रकरणात अटक

आरोपींच्या चौकशीतून हा जुगाराचा क्लब अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय चालवत असल्याचे चौकशीत पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी हिमालय याला अटक केली.

SHARE

'मैने प्यार किया' फेम भाग्यश्री पटवर्धनचा पती हिमालय दसानी याला जुगार अड्डा चालवल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. मागील महिन्यात पोलिसांनी अंबोली परिसरात एका जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई केली होती. हा जुगाराचा अड्डा हिमालय दसानी चालवत असल्याचं पुढे आल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. 


जामिनावर मुक्तता

अंबोली परिसरात जून महिन्यात अंबोली पोलिसांनी एका जुगाराच्या अड्यावर कारवाई करत १५ जणांना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून हा जुगाराचा क्लब अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय चालवत असल्याचं पुढे आलं. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी हिमालय याला अटक केली. हिमालयला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याची १५ हजारांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.हेही वाचा -

सायनमध्ये पत्नीकडून पतीवर जीवघेणा हल्ला

उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या