राष्ट्रीयकृत बँकेची ९७ कोटी रुपयांची फसवणूक, सीबीआयने केला गुन्हा दाखल


राष्ट्रीयकृत बँकेची ९७ कोटी रुपयांची फसवणूक, सीबीआयने केला गुन्हा दाखल
SHARES

राष्ट्रीयकृत बँकेची ९७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) नुकतीच सिद्धीविनायक लॉजीस्टीक लि.सह कंपनीचे प्रमोटर व संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः- रेस्टॉरंट आणि बार परवाना शुल्कात ५० टक्क्यांची कपात

कंपनीनसह प्रमोटर रुपचंद बैद, संचालक लक्ष्मी देवी बैद, संचालक राजकुमार बैद, संचालक दिपककुमार बैद यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार २०१२ मध्ये ३३७ वाहनांच्या खरेदीसाठी १०२ कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. त्यासाठी वाणिज्य मालमत्ता व गाड्या तारण ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर ४३२ वाहने खरेदी केल्याची यादी बँकेला प्राप्त झाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये पडताळणी केली असता एकच गाडी एकापेक्षा जास्त व्यक्तींना विकल्याचे दाखवून अधिक कर्ज घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच सादर करण्यात आलेल्या ४७ गाड्यांपैकी २७ गाड्यांची नोंदणी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ऑक्टोबर २०१५ मध्ये हे खाते बुडीत निघाले. अखेर युनियन बँकेच्या तक्रारूवरून नुकतीच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी डिसेंबर महिन्यात आंध्र बँकेची ८९ कोटींची फसवूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा