Corona virus : मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश, गुन्हे शाखा ९ ची मोठी कारवाई


Corona virus :  मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश,  गुन्हे शाखा ९ ची मोठी कारवाई
SHARES

मुंबईच्या गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी तीन ट्रक भरून मास्क हस्तगत केले आहेत. तब्बल अंदाजे  २६ लाख मास्क पोलिसांनी हस्तगत केले आहेत. काळाबाजार करण्यासाठी हे मास्क आणल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. बाजारात या मास्कची किंमत १५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे शाखा ९ ला भेट देत या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत पोलिसांचे कौतुक केले. त्यावेळी सोबत पोलिस आयुक्त परमबिर सिंह ही सोबत होते. 

 हेही वाचाः- Corona virus: आता कोरोनाची टेस्ट घर बसल्या करता येणार


देशात कोरोना बाधितांची संख्या आता १०१ वर जाऊन पोहचली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही जणांनी मास्कचा काळाबाजार करण्यास सुरूवात केली. हवे त्या किंमतीला ही टोळी मास्क विकत होती. याबाबतची माहिती गुन्हे शाखा ९ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली देसई यांच्या पथकाने अंधेरीत कारवाई केली. पोलिस कारवाईत त्यांना तीन ट्रकभरून मास्क आढळून आले. तब्बल २६ लाखा हे मास्क असून बाजारात या मास्कची किंमत १४ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः गुन्हे शाखेला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पोलिस आयुक्त परमबिर सिंग हे देखील उपस्थित होते. 

 हेही वाचाः- भाजीआवक बंद, भाजीपाला महागण्याची शक्यता


या पूर्वी पोलिसांनी नाहूरमधून तब्बल एक कोटी रुपयांचं सॅनिटायझर साठा जप्त करण्यात आलं आहे. मुंबईतून विदेशात पाठवण्यासाठी हँड सॅनिटायझर बनवण्यात येत होते. मात्र त्याचवेळी अन्न आणि औषध प्रशासनानं धाड टाकत कारवाई केली. विशेष हे सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्यांनी उत्पादनाचा परवानाही घेतला नव्हता. सिद्धिविनायक डायकॅम प्रा.लिमिटेड कंपनीचे नाव या कंपनीचे नाव असून  जग भरात सॅनिटायझरचा दुष्काळ असल्याचा फायदा घेत बक्कळ पैसे कमावण्याचा कंपनीचा प्रयत्न होता.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा