असा केला जातो टीआरपीद्वारे गैरव्यवहार

टीआरपीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष केलेल्या चॅनेल्सना होतो आणि अशा प्रकारे फेरफार करून टीआरपी वाढवल्या मुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते

असा केला जातो टीआरपीद्वारे गैरव्यवहार
SHARES

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट(टीआरपीमध्ये) फेरफार करून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. टीआरपी वाढवण्यासाठी तीन माध्यमांनी गोपनीय माहितीचा स्वत: च्या चँनलचा टिआरपी वाढवण्यासाठी वापर केल्याची धक्कादायकबाब मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी उघडकीस आणली आहे. मात्र टीआरपी म्हणजे काय आणि त्याचा वापर करून कसा गैरव्यवहार केला जातो याची माहिती पुढील प्रमाणे...

हेही वाचाः-आता खासगी बसमधूनही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी

भारत ब्रॉडकास्ट ओडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) ही संस्था भारतीय माहीत व प्रसारण मंत्रालय (एम आयबी) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( ट्राय) यांच्या अधिपत्याखाली काम करते. ही संस्था दावा करते की, ते ३२ ते ४० हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या भारतीय टीव्हीवरील जाहिराती उद्योगाला उपयुक्त माहिती पुरविते. या संस्थेने संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी जवळपास ३ हजार बोरोमिटर्स बसवले असून त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या पाहिलेल्या कार्यक्रमांवर निगराणी ठेवली जाते व त्याद्वारे विविध चॅनेल्सना रेटींग दिले जाते. बीएआरसीने दिलेल्या रेटिंग्ज नुसार जाहिरातदार जाहिरात प्रसारित करणार्यांना पैसे देतात. टीआरपीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष केलेल्या चॅनेल्सना होतो आणि अशा प्रकारे फेरफार करून टीआरपी वाढवल्या मुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते

हेही वाचाः- पुछता है भारत! अर्णब गोस्वामीला अटक कधी?

मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट टीआरपीचे रॅकेट टेलिव्हिजन जाहिरात इंडस्ट्री सुमारे ३० ते ४० हजार कोटी रुपयांची आहे. टीआरपी दराच्या आधारे जाहिरात दर ठरविला जातो. कोणत्या चॅनेलनुसार जाहिरात मिळेल, त्यानुसार निर्णय घेण्यात येतो. टीआरपीमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम महसुलावर होतो. याचा काही लोकांना फायदा होतो, तर काही लोकांना नुकसान होतो. टीआरपी मोजण्यासाठी बीएआरसी ही एक संस्था आहे. ते वेगवेगळ्या शहरात बॅरोमीटर लावतात. बॅरोमीटर बसवण्याचे काम मुंबईतील हंसा नावाच्या संस्थेला देण्यात आले होते. तपासादरम्यान हंसाबरोबर काम करणारे काही जुने कामगार टेलिव्हिजन वाहिनीवर माहिती शेअर करत असल्याचे समोर आले आहे. ते म्हणत की, आपण घरी असाल किंवा नसाल , चॅनेल चालू ठेवा. काही लोक जे अशिक्षित आहेत, त्यांच्या घरी इंग्रजी चॅनेल वापरले जात होते. आम्ही हंसाच्या माजी कामगारांना अटक केली आहे. या आधारे तपास वाढविण्यात आला.

हेही वाचाः- ऑक्सफर्ड विद्यापीठाकडूनही धारावी पॅटर्नचं कौतुक

 या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असून त्यांना ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस यातील आरोपींच्या साथीदारांचा शोध घेत आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या खात्यातून २० लाख रुपये जप्त करण्यात आले असून आठ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात येत्या दोन दिवसात रिपब्लिक भारतशी संबंधीत काहींची चौकशी केली जाणार आहे. अर्णब गोस्वामी यांचीदेखील चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रिपब्लिक भारतने हे सर्व आरोप फेटाळले आहेत त्यामुळे फेक टीआरपी प्रकरणात मुंबई पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा