मोबाइलवर वेब सिरीज ऑनलाईन पाहत असाल, तर सावधान तुम्हच्यावर होऊ शकतो सायबर हल्ला...

एखाद्या चुकीच्या व फेक वेबसाईट लिंकवर फुकट वेबसिरीज, नाटक ,चित्रपट बघण्यासाठी क्लिक केल्यास तुमचा संगणक अथवा मोबाइलवर एखादे मालवेअर डाउनलोड होऊन तुमचे डिवाईस हॅक होऊ शकतात

मोबाइलवर वेब सिरीज ऑनलाईन पाहत असाल,  तर  सावधान तुम्हच्यावर होऊ शकतो सायबर हल्ला...
SHARES
लॉकडाऊनच्या काळात मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घर बसल्या जो तो मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेला असतो. अशाच नागरिकांसाठी नवनवीन वेज सिरिज इंटरनेटवर आलेले आहे. त्याकडे नागरिक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. हेच ओळखून सायबर चोरट्यांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. हे वाचून तुम्ही ही हैराण व्हालं, त्यामुळेच ऑनलाईन वेब सिरीज, नाटक ,चित्रपट बघायला व गाणी ऐकायला इंटरनेटवरील डाउनलोड करत असाल, तर सावधान... अशा लिंक व सबस्क्रिप्शन तुम्हाला महागात पडू शकतं, याबाबत सावधानता बाळगण्याचे आदेश राज्य सायबर विभागातर्फे देण्यात आले आहेत.


सध्या लॉकडाउनच्या काळात, घरातील सर्व व्यक्ती इंटरनेटचा वापर करत असल्यामुळे इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे . बरेच नागरिक ऑनलाईन वेब सिरीज, नाटक ,चित्रपट बघायला व गाणी ऐकायला डाउनलोड करत आहेत .   आपण सर्व वेबसिरीज नाटक ,चित्रपट हे अधिकृत वेबसाईटवरच बघावे, तसेच गाणी पण अधिकृत वेबसाईटवरूनच डाउनलोड करण्याचे आवाहन सायबर विभागाकडून करण्यात आले आहे . एखाद्या चुकीच्या व फेक वेबसाईट लिंकवर फुकट वेबसिरीज, नाटक ,चित्रपट बघण्यासाठी क्लिक केल्यास तुमचा संगणक अथवा मोबाइलवर एखादे मालवेअर डाउनलोड होऊन तुमचे डिवाईस हॅक होऊ शकतात .तसेच वेबसिरीज, नाटक ,चित्रपट, गाणी असणाऱ्या अशा वेबसाईटचे सबस्क्रिप्शन भरण्याआधी ती वेबसाईट अधिकृत आहे का याची खात्री करून घ्या . जर अशी वेबसाईट फेक असल्यास तुमच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स या फेक वेबसाईटच्याद्वारे सायबर भामट्यांच्या हाती लागू शकतात. त्याबाबत सावधानता बाळगण्याच्या सूचना राज्य सायबर विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊनमध्ये राज्यात 395 सायबर गुन्हे
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून राज्यात 395 गुन्हे दाखल केले आहेत.टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये  दाखल 395 गुन्ह्यांपैकी 17 गुन्हे अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 169 गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 154 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक  विडिओ शेअर प्रकरणी 18 गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 7 गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य समाज माध्यमांवर ( ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी 43 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 211 आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी102 आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात आल्या आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा