'डॅडी'च्या मुलीचं लग्न, पोलिसांच्या खास परवानगीने पुण्याहून वऱ्हाड मुंबईला


'डॅडी'च्या मुलीचं लग्न, पोलिसांच्या खास परवानगीने पुण्याहून वऱ्हाड मुंबईला
SHARES
कुख्यात गुंड अरूण गवळीच्या मुलीचा विवाह  उद्या (8 मे) रोजी मराठी अभिनेता अक्षय वाघमारे याच्याशी संपन्न होणार आहे. पेरोलवर बाहेर असलेल्या अरुण गवळीच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा संपन्न होणार असून या सोहळ्याला फक्त घरातल्या मोजक्या व्यक्तीच उपस्थित राहणार असल्याचे गवळी कुटुंबियांनी पोलिसांना कळवले आहे. त्यासाठी पुण्याहून अक्षय त्याच्या घरातील मोजक्या माणसाचे वऱ्हाड घेऊन आज मुंबईत दाखल होणार आहे.

मुंबईतील कुख्यात गुंड अरुण गवळीची मुलगी योगिता आणि अभिनेता अक्षय हे खरतर 29 मार्च रोजीच लग्नाच्या बेडित अडकणार होते. लग्नाची सर्व पूर्वतयारी दोघांनी केली होती. माञ देशावर ओढावलेल्या कोरोना या महामारीमुळे राज्यात लाँकडाऊन सुरू झाल्यामुळे त्यांच्यावर लग्न पुढे
ढकलण्याची  वेळ आली. माञ या महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. त्या दोघांनी आता घरच्यांच्या उपस्थितीतच हा विवाहसोहळा साधे पणात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लग्नासाठी अक्षयने पुणे पोलिसांकडे मुंबई प्रवासाकरता अर्ज केला होता. त्याला पुणे पोलिसांनी परवानगी दिली असून 8 मे रोजी हा विवाहसोहळा अरूण गवळी यांच्या भायखळा येथील दगडीचाळीतील घरी संपन्न होणार आहे. तशी माहिती गवळी कुटुंबियांनी ही आग्रीपाडा पोलिसांना दिल्याची माहीती सूञांनी दिली आहे. पेरोलवर असलेल्या गवळी यांची लाँकडाऊन उठल्यानंतर पून्हा तुरुंगात रवानगी केली जाऊ शकते. त्यामुळे त्यांना पून्हा लग्नासाठी जामीन मिळणे कठीणच आहे. त्यामुळेच डँडींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न होत असल्याची चर्चा आहे.

या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, सॅनिटायझर आणि फेस मास्क उपस्थितांना दिले जातील असंही अक्षयने सांगितलं. तसेच योग्य वेळी धूमधडाक्यात रिसेप्शनचं आयोजन केलं जाईल अशीही माहिती त्याने दिली. गुरूवारी सायंकाळी या दोघांच्या हळदीचा कार्यक्रम दगडीचाळीत होणार आहे.अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अक्षयने बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. तसंच ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातही अक्षयनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी योगिता काम करते. काही चित्रपटांची निर्मिती देखील तिनं केली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा