पैशांसाठी तिने सख्या अल्पवयीन बहिणीला विकलं, मानखुर्दमधील धक्कादायक प्रकार

आपण लग्नासाठी एक लहान मुलीच्या शोधात असल्याचे सांगितले. तसेच जो आपल्याला त्याची लहान मुलगी देईल, त्या मुलीच्या घरातल्यांना आपण २ लाख रुपयेही देऊ असे सांगितले

पैशांसाठी तिने सख्या अल्पवयीन बहिणीला विकलं, मानखुर्दमधील धक्कादायक प्रकार
SHARES
मुंबईत नात्याला काळीमा फासणारी एक घटना मानुखुर्द परिसरात घडली आहे. अवघ्या दोन लाख रुपयांसाठी २५ वर्षीय महिला आणि तिचा नवरा अल्पवयीन १६ वर्षीय बहिणीचा विवाह ४९ वर्षीय व्यक्तीशी ठरवत होते. मात्र वेळीच ही घटना मुलीची आईला समजल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी पीडित मुलीची मोठी बहिण, भावोजी आणि ४९ वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. 
हेही वाचाः- वो तो है सटकेला!
मानखुर्द परिसरात पीडित  १६ वर्षीय मुलगी तिच्या २५ वर्षीय मोठी बहिण आणि भावोजींसोबत रहात होती.  दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याच परिसरात राहणारा आरोपी ४९ वर्षीय पीडितेच्या मोठ्या बहिणीला आणि भावोजींना बाजारात भेटला, त्याचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. त्या भेटी दरम्यान त्याने दोघांना आपण लग्नासाठी एक लहान मुलीच्या शोधात असल्याचे सांगितले. तसेच जो आपल्याला त्याची लहान मुलगी देईल, त्या मुलीच्या घरातल्यांना आपण २ लाख रुपयेही देऊ असे सांगितले. हे एकूण पीडित मुलीची मोठी बहिण आणि तिच्या नवऱ्याच्या मनात लालसा निर्माण झाली. या पैशाच्या हव्यासातून त्या दोघांनी  अल्पवयीन पीडित मुलीचा  व्यवहार तिच्या आणि तिच्या आईच्या नकळत  ठरवला. 
 हेही वाचाः- ईडीने चार वेळा पत्र लिहूनही पोलिस देईनात सुशांतचा मोबाइल
व्यापाऱ्यानेही मुलीला पाहण्याच्या नावाखाली पीडितेच्या मोठ्या बहिणीला तिला घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार २ आॅगस्ट रोजी पीडित मुलीची मोठी बहिण पीडित मुलीला घेऊन व्यापाऱ्याने बोलवलेल्या ठिकाणी गेली. त्यावेळी मुलीशी एकांतात गप्पा मारण्याच्या नावाखाली तो तिला एका खोलीत घेऊन गेला. त्यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केले. वेदनेनं असह्य झालेल्या पीडित मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती कशीबशी आईपर्यंत पोहचवली. या घटनेनंतर पीडितमुलीच्या आईने मानुखुर्द पोलिसात तिची मोठी मुलगी, जावई आणि अत्याचार करणाऱ्या त्या भाजीविक्रेत्यावर नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात  कलम ३७६, ३६६ (अ),३७०,३२३,६ आणि १७ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी तिघांना अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा