धक्कादायक ! पोलिसाकडूनच महिला पोलिस शिपाईवर अत्याचार


धक्कादायक !  पोलिसाकडूनच महिला पोलिस शिपाईवर अत्याचार
SHARES

पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला धक्का देणारी घटना उघडकीस आली आहे. मुंबई पोलिस दलातील एका पोलिस शिपायाने महिला पोलिस शिपायाला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

राज्यात सरकारनमधील नेते भाषणांमध्ये महिला सुरक्षेची सातत्याने हमी देतात. परंतु त्यांच्या पोलिस विभागात कुंपण शेत खात असल्याचे प्रकार खुलेआम घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय  एका महिला पोलिस शिपाईवर खाकी वर्दीतल्या एका नराधमाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित आणि आरोपी हे दादर परिसरातच राहणारे आहेत. आरोपीहा विवाहित असताना त्यानं पीडित युवतीला लग्नाचे आमीष दाखवून २०१५ पासूनशारिरीक संबध ठेवले. मात्र लग्नाबाबत विचारले असता  आरोपी टाळाटाळ करत असल्यामुळे मुलीला संशय आला. मुलीने आरोपीची चौकशी केली असता. आरोपीचे या पूर्वीच लग्न झाले असल्याचे कळाल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

त्यानंतर आरोपीला जाब विचारला असता. त्याने तक्रारदार महिलेला मद्यधुंद अवस्थेत मारहाण केली. आपली फसणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने भोईवाडा पोलिसात तक्रार नोंदवली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार भोईवाडा पोलिस ठाण्यात ३७६(२)(N), ३७७, ४२०, ५०४,३२३ भा.द.वी कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा