Exclusive ‘त्या’ अश्लील फोनला कंटाळून ती करणार होती आत्महत्या, सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

आधी फ्रेंडशिप करून मग तो तिला प्रपोज करणार होता. मात्र दोन वेळा रिक्वेस्ट पाठवून ही तरुणीने त्याची रिक्वेस्ट नाकारल्याने त्याला राग अनावर झाला.

Exclusive ‘त्या’ अश्लील फोनला कंटाळून ती करणार होती आत्महत्या, सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
SHARES

सोशल मिडियावर सजगतेने नजर ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांमुळे एका तरुणीला आत्महत्येपासून रोखण्यात यश आले आहे. एकतर्फी प्रेमात २१ वर्षीय तरुणीने नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने २१ वर्षीय तरुणाने तिला इतका मानसिक त्रास दिला की, तरुणीने आत्महत्या हे टोकाचे पाऊल उचण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अभिषेक पवार (२१) याला अटक केली आहे.

हेही वाचाः-सरकारला  मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का?- राज ठाकरे

वाकोला परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीवर तिच्याच घरा शेजारी राहणारा अभिषेक पवार हा एकतर्फी प्रेम करत होता. यातूनच त्याने तरुणीशी जवळीकता वाढवण्यासाठी तिला इन्स्टाग्रामवर फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली. आधी फ्रेंडशिप करून मग तो तिला प्रपोज करणार होता. मात्र दोन वेळा रिक्वेस्ट पाठवून ही तरुणीने त्याची रिक्वेस्ट नाकारल्याने त्याला राग अनावर झाला. या रागातूनच त्याने तरुणीला त्रास देण्याचे ठरवले. त्याने तरुणीच्या नावाने तिचाफोटो वापरून इन्स्टावर बनावट अकाऊट तयार केले. त्यानंतर त्याने तिच्या नावानेअनेकांना तिचा मोबाइल नंबर पाठवून अश्लील संभाषणासाठी या नंबरवर फोन करा असे मेसेज पाठवले. अभिषेकच्या या मुर्खपणामुले तरुणीला दिवसाला ४० ते ५० फोन येऊ लागले. १८ जुलैपासून हा सर्व प्रकार ती सहन करत होता. अवघ्या दीड महिन्यात तिला ३०० हून अधिक अश्लील फोन येत राहिले. सुरवातीला या घटनेची माहिती तिने घरातल्यांना दिली नाही.

हेही वाचाः- कल्याण डोंबिवलीत नवीन ४०५ कोरोना रुग्ण

मात्र वारंवार येणाऱ्या फोनच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने ही बाब तिच्या आईला सांगितली. हे असेच सुरू राहिले, तर आत्महत्या खेरिज माझापुढे कोणाताही पर्याय नसल्याची भिती तरुणीने आईजवळ बोलून दाखवल्यानंतर तरुणीची आई घाबरली. या प्रकरणी तिने सायबर पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. घटनेची गंभीर दखल घेत सायबर विभागाच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सूत्र हलवली. पोलिसांनी फेसबूकच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून संबधित बनावट खाते बनवणाऱ्याची माहिती मिळवली. तसेच पीडितेच्या आईला मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात बोलावले. त्या ठिकाणी करंदीकर यांनी मुलीची समजूत काढून तिला समुपदेशन केले. तपासात मुलीच्या परिसरात राहणाऱ्या अभिषेक पवारने हे कृत्य केल्याचे पुढे आल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत. अभिषेक विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. एकतर्फी प्रेमातून त्याने हे सर्व कृत्य केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा