'फ्री' काश्मिर पोस्टर प्रकरणात पोलिसांकडून ‘सी’ समरी अहवाल सादर


'फ्री' काश्मिर पोस्टर  प्रकरणात पोलिसांकडून ‘सी’ समरी अहवाल सादर
SHARES

नवी दिल्लीत जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्याप्रकरणी मुंबईत विद्यार्थ्यांनी ठिक ठिकाणी रसत्यावर उतरून आंदोलन केली. या प्रकरणी विना परवानगी आंदोलनकरत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर चार गुन्हे नोंदवले आहेत. मात्र यात वादाचा मुद्दा ठरला तो हातात 'काश्मीर फ्री'चे पोस्टर घेऊन उभे राहिलेल्या तरुणीचा या तरुणीवर मुंबईच्या आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र तब्बल १ वर्षानंतर आझाद मैदान पोलिसांनी या प्रकरणात आता ‘सी’ समरी अहवाल सादर केला आहे.

जानेवारी २०१९ जेएनयूतील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्याचे पडसाद देशभरात पहायला मिळले. मुंबईतही दोन दिवस विद्यार्थी आणि काही सेलिब्रिटींनी या आंदोलनात सहभाग घेतला. मात्र या आंदोलनात सर्वात वादाचा मुद्दा ठरला तो म्हणजे हातात फ्री काश्मिरचे पोस्टर घेऊन उभे राहिलेल्या तरुणीचा, मेहक मिर्झा असे या तरुणीचे नाव असून तिच्या विरोधात कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेशाने ती स्टोरीटेलर असुन तिने फेसबुकच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करत संपूर्ण घटेनेची अधिक माहिती दिली होती. मेहक हिने असे लिहिले की, ‘मी काल संध्याकाळी सात वाजल्याच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाच्या येथे गेली असता. तेथे जोरदार आंदोलन सुरु होते. या आंदोलनात मी सुद्धा सहभागी झाले.

हेही वाचाः-राज्यात आज २ हजार ४९८ नवे रुग्ण, ५० जणांचा दिवसभरात मृत्यू

आंदोलनात सामील झालेले सर्व विद्यार्थी जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या विरोधात न्याय देण्यात यावा अशी मागणी करत होते. त्याचवेळी मी काही लोकांना जेएनयूच्या समर्थनार्थ एनआरसी, सीएए सारख्या मुद्द्यांवरुन पोस्टर बनवताना पाहिले गेले. माझ्या बाजूला फ्री कश्मीर लिहिले असलेले पोस्टर ठेवण्यात आले होते. त्यावेळी माझ्यामध्ये कश्मीरी लोकांच्या मूळ हक्कांबाबतचा विचार आल्याने तो पोस्टर घेऊन मी उभे असल्याचे तिने स्पष्ट दिले  तिच्यासोबत सुवर्णा साळवे, फिरोज मिठबावकर, उमर खालिद आणि अन्य आंदोलकांवर आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. कालांतराने पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदान येथे पिटाळून लावले. या प्रकरणात आता तब्बल एका वर्षानंतर पोलिसांनी तपास करून न्यायालयात सी समरी अहवाल सादर केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा