सुशांत सिंह राजपूत प्रकरण , आणखी एका ड्रग्ज तस्कराला अटक


सुशांत सिंह राजपूत प्रकरण , आणखी एका ड्रग्ज तस्कराला अटक
SHARES

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोनं (एनसीबी) एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील एनसीबीनं मिलत नगर, लोखंडवाला भागात चार ठिकाणी छापेमारी केली असून फरार ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकाल याला अटक केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी कोट्यावधीचं ड्रग्ज या कारवाईत जप्त केलं आहे.

 एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत चार ठिकाणी NCB ने कारवाई केली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ही मोठी कारवाई असून फरार आरोपी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार आहे. NCB च्या अधिकाऱ्यांनी त्याच्याजवळून कोट्यावधी रुपयांचा ड्रग्ज साठा हस्तगत केला आहे.  त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.ड्रग्ज प्रकरणातील दुसरा एक आरोपी अनुज केशवाणी याला महाकाल ड्रग्जचा पुरवठा करत असतं. त्यानंतर केशवाणी पुढे दुसऱ्यांना हे ड्रग्ज पुरवत असे, असं एनसीबीनं सांगितलं आहे. ओशिवरा भागातील मिलत नगर आणि लोखंडवाला येथे एनसीबीनं बुधवारी सकाळी ही छापेमारी केली. यामध्ये महाकाल याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचाः- ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, न्यायालयाने दिली २० वर्षाची कठोर शिक्षा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा