कोरोनाच्या काळात नाचगाणे पडले महागात, ओशिवरात ९७ जणांवर कारवाई

कोरोनाच्याकाळात ऐकीकडे प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटत असताना, काही बेशिस्त नागरिकांना मात्र याबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचे यावरून दिसते.

कोरोनाच्या काळात नाचगाणे पडले महागात, ओशिवरात ९७ जणांवर कारवाई
SHARES
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात प्रशासनाकडून वेळोवेळी ओरडून ओरडून सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, तोंडाला मास्क लावा, समूह संपर्क टाळा. असे सांगितले जात असताना. अंधेरीच्या ओशिवरा येथील उच्चभ्रू परिसरातील बॉम्बे ब्रूट (मुगल शाशा) या पबमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवत,  बिनदिक्कत हुक्का, नाचगाणी आणि दारूची पार्टी सुरू असल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. ओशिवरा पोलिसांनी रविवारी या पबवर कारवाई करत ९७ जणांवर कारवाई केली आहे. 
हेही वाचा:-ईडीने चार वेळा पत्र लिहूनही पोलिस देईनात सुशांतचा मोबाइल
कोरोनाच्या काळात प्रशासनाने सर्वच दुकानदारांना नियम व अटींच्या पार्श्वभूमिवर परवानगी दिली आहे. तर परवानगी देतानाही, सोशल डिस्टंसिग आणि समूह संपर्क टाळण्याबाबतच्या विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोनाशी दोन हात करण्यात ऐकीकडे प्रशासन व्यस्त असताना. ओशिवरा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या लिंक रोड येथील  बॉम्बे ब्रूके (मुगल शाशा) जोगेश्वरी (पश्चिम )येथील पबमध्ये मोठ्या संख्येने तरुण जमत पार्टी करत असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली. रात्री ३ च्या सुमारास पबमध्ये मोठ मोठ्याने गाणी आणि नाच गाणे सुरू होते. तर दारू आणि हुक्याच्या तंदरीत अनेक तरुण शुद्धीत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. 
 हेही वाचा:-महेंद्र सिंग धाेनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
या घटनेची गंभीर दखल घेऊन पबच्या मॅनेजर आणि दोन वेटरसह तब्बल ९७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  त्यामध्ये  ६५ मुल तर २८ मुलींचाही समावेश आहे. या सर्वांवर ओशिवरा पोलिस ठाण्यात २९४, १८८, ३३६, २८५, २६९, ३४ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. कोरोनाच्याकाळात ऐकीकडे प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटत असताना, काही बेशिस्त नागरिकांना मात्र याबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचे यावरून दिसते. 
 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा