रिया चक्रवर्तीच्या भावाला अखेर जामीन मंजूर

तब्बल ९० दिवसांनी शौविकला जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणात रियाला यापूर्वीच जामीन मिळाला होता.

रिया चक्रवर्तीच्या भावाला अखेर जामीन मंजूर
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बाँलीवूडची झाडाझडती सुरू होती. अशात सुशांतला रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीने ड्रग्ज पुरवल्याचे पुढे आल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली होती. तब्बल ९० दिवसांनी आता शौविकला NDPS कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणात रियाला यापूर्वीच जामीन मिळाला होता.

शौविकला ३ सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती. आता तब्बल ३ महिन्यांनंतर त्याला जामीन मिळाला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) २९ दिवसांनी काही अटीशर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला होता. रियाचा जामीन ७ ऑक्टोबर रोजी मंजूर करण्यात आला होता.मात्र तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. याप्रकरणी अटकेत असणाऱ्या सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांचा जामीन अर्ज देखील खंडपीठाने मंजूर केला होता. तर शौविकबरोबर अब्दुल बसीथ परिहारचा जामीन अर्थ फेटाळण्यात आला आहे. NDPS कायद्याच्या विविध तरतुदींनुसार त्यांच्याविरोधात एनसीबीने खटला दाखल केला होता. आता शौविकचा जामिन मंजूर झाल्यामुळे त्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- कोरोनाची लस सर्वातआधी कोणाला मिळणार? आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

काही महिन्यांपूर्वी जेवव्हा एनसीबी रिया, तिचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेशच्या बँक खात्याची छाननी करत होते, तेव्हाच त्यांना रियाच्या कार्डवरून झालेला एक आर्थिक व्यवहार सापडला होता. रियाच्या कार्डवरून एका ड्रग डिलराला बड म्हणजे गांज्याचे पैसे देण्यात आले होते. त्यावरुन त्यांनी शौविकभोवती फास आवळला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा