‘शक्ती’ कायद्यामुळे महिलांवरील अत्याचाराला बसणार चाप

आंध्रप्रदेशात दिशा कायदा लागू केल्यापासूनच महाराष्ट्रात देखील असा कायदा आणण्याबाबत हालचाली सुरु झाल्या होत्या.

‘शक्ती’ कायद्यामुळे महिलांवरील अत्याचाराला बसणार चाप
SHARES

राज्यात महिलांवरील अत्याचाराचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी राज्यसरकारने नवा शक्ति कायद्या आणला आहे. आंध्रप्रदेशात दिशा कायदा लागू केल्यापासूनच महाराष्ट्रात देखील असा कायदा आणण्याबाबत हालचाली सुरु झाल्या होत्या. या कायद्याची माहिती घेण्यासाठी स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्रप्रदेशचा दौरा केला होता. शक्ती कायद्याचा प्रस्ताव विधान सभेत मंजूर झाल्यानंतर तो केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.

हेही वाचाः- गुड न्यूज! आता सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्त

याच पार्श्वभुमीवर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे म्हटले आहे की, शक्ती कायद्याअंतर्गत आरोपीला २ वर्षांची शिक्षा सुनावली जाणार आहे. अनिल देशमुख यांनी शक्ती कायद्याबद्दल अधिक माहिती देत पुढे असे म्हटले आहे की, या कायद्याअंतर्गत आरोपीला २ वर्षांची शिक्षा होणार आहे. जे कोणीही महिलांचे सोशल मीडियात चुकीच्या पद्धतीने फोटो पोस्ट करतील त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. त्याचसोबत जरी महिलांनी त्यांच्या विरोधातील खोटी तक्रार दाखल केल्यास त्यांना २ वर्षाची शिक्षा दिली जाणार असल्याचे ही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा- मुंबई खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई, सराईत दरोडेखोर अटकेत

 शक्ती कायद्यानुसार शिक्षेचे प्रमाणात वाढवण्यात आले आहे. तर २ डिसेंबरला पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शक्ती कायद्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली गेली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती दिसून आली. या शक्ती कायद्यानुसार मुलांसह महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराल चाप बसावा या हेतूने त्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्स सरकारच्या या निर्णयाचे मनसे कडून स्वागत करण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा