ओखी वादळ, मुंबईतल्या पावसाचे लाईव्ह अपडेट

हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार मंगळवारी दुपारपासून मुंबईसहित महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील ६ तासांत धुवांधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईतील पाऊस, लोकल ट्रेन सेवा, वाहतूककोंडी, पाणी तुंबण्यासंदर्भातील सर्व 'लाइव्ह' अपडेट्स येथे मिळवा.।

Live Updates

अफवा पसरवणाऱ्या व्हिडिओंकडे दुर्लक्ष करा

हा व्हिडिओ वांद्रे-वरळी सी लिंक येथील असल्याची अफवा पसरली होती. पण हा व्हिडिओ वांद्रे-वरळी सी लिंक येथील नसून अशा व्हिडिओकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

3:26 PM
समुद्र किनारी मोठ्या लाटा उसळल्या

मंगळवारी दुपारी १२.४३ वाजता ४.३५ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या 

2:51 PM
या गोष्टींची घ्या काळजी


2:44 PM

४ डिसेंबर रोजी मुंबईपासून ८७० किमी अंतरावर धडकलेले ओखी चक्रीवादळ हळूहळू गुजरातच्या दिशेने सरकत आहे. सतर्कतेच्या दृष्टीने राज्य सरकारने महानगरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २४ तासांत मुंबईसह कोकणामध्ये सोसाट्यांच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोबतच सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहनही केले आहे. 

ओखी चक्रीवादळाचे लाइव्ह अपडेट

Latest News