Advertisement

CBSC Exams : बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द

देशभरातील CBSC बोर्डाच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

CBSC Exams : बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द
SHARES

देशभरातील CBSC बोर्डाच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सीबीएससी (CBSC Exams) बोर्डाच्या दहावी- बारावीच्या (10th and 12th Exam) परीक्षांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

१ ते १५ जुलै दरम्यान होणाऱ्या इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) यासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सीबीएससी बोर्डानं आपली बाजू मांडली. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. आता मागील तीन परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना मार्क्स दिले जातील. परंतू, विद्यार्थ्यांकडे भविष्यात परीक्षा देण्याचा पर्याय असेल.



१२वी ची परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान होणार होती. १०वी आणि १२वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोर्टात परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. यात म्हटलं होतं की, सीबीएसईच्या परदेशातील २५० शाळेत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात कर्नाटकचे एक उदाहरणदेखील देण्यात आले. परीक्षा देणाऱ्या मुलाचे वडील कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानं २४ मुलांना क्वारेंटाइन करण्यात आलं होतं.

यापूर्वी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. सीबीएससी (CBSC)  बोर्डाच्या परीक्षा होणार की रद्द केल्या जाणार याबाबत अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रम होता. अखेर सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर या परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.



SSC-HSC Results: जुलै अखेरपर्यंत लागणार दहावी, बारावीचा निकाल

यंदा ११वी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडून नवीन तरतुदी जाहीर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा