Advertisement

राज्यात 'या' तारखेपासून कॉलेज सुरू

कोरोनाच्या नियमाचे (Corona) पालन करून महाविद्यालय सुरू होणार असल्याचे नवे आदेश काढण्यात आले आहेत.

राज्यात 'या' तारखेपासून कॉलेज सुरू
SHARES

राज्यातील महाविद्यालयं (Maharashtra College Reopen) १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत, अशी अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. कोरोनाच्या नियमाचे (Corona) पालन करून महाविद्यालय सुरू होणार असल्याचे नवे आदेश काढण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे विचारात घेऊन राज्यातल्या शाळा (School Reopen) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याप्रमाणे सोमवारपासून राज्यातल्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

शाळांबाबत निर्णय झाल्यानंतर कॉलेजही सुरू करण्यााबाबत राज्य सरकारकडून हलचाली सुरू होत्या. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला होता, अखेर त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याने कॉलेज सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राज्यातली महाविद्यालयं सुरू करताना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आता कोरोनाची तिसरी लाट आल्याने धोका अजून वाढला आहे, मात्र बऱ्यापैकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्याने महाविद्यालये सुरू करण्याबाबत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याबाबत शासन सकारात्मक होते, त्याच अनुशंगाने हा निर्णय आज घेण्यात आला आहे.

महाविद्यालीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थिती लावण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरू करताना सोबतच शासन लसीकरणावर भर देत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम आणखी वेगवान करण्यात आली आहे.

गेल्या दोन अडीच वर्षापासून कोरोना कहर सुरू असल्यानं अनेक परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना मुल्ल्यांकनाच्या आधारे पास करण्यात आलं होतं.



हेही वाचा

मुंबईतील शाळांमध्ये ४२ टक्के विद्यार्थ्यांनी लावली हजेरी

मुंबईतील पहिल्या ‘सेफ स्कूल झोन’चा प्रयोग यशस्वी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा