Advertisement

तोक्ते वादळात मुंबईत पडली 'इतकी' झाडं, परदेशी झाडं अधिक

तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. या झाडांमध्ये विदेशी झाडांचं प्रमाण अधिक होते

तोक्ते वादळात मुंबईत पडली 'इतकी' झाडं, परदेशी झाडं अधिक
SHARES

तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. या झाडांमध्ये विदेशी झाडांचं प्रमाण अधिक होते. १६ व १७ मे रोजी मुंबई किनारपट्टी लगतच्या परिसरातून तोत्के चक्रीवादळ गेलं. या वादळाचा वेग ११४ किलोमीटर प्रती तास होता. 

चक्रीवादळामुळे आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे मुंबईत ८१२ झाडे पडली. यापैकी ५०४ झाडे  खासगी क्षेत्रातील असून ३०८ झाडे सार्वजनिक परिसरातील आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाने ही झाडे अल्पावधीत हटवून रस्ते मोकळे केले आहेत.

एकूण पडलेल्या झाडांपैकी ७० टक्के पडलेली झाडं विदेशी प्रजातींची आहेत.  सोनमोहर (Peltoforum), गुलमोहर, गुळभेंडी (Thespesia), रेन-ट्री, रॉयल पाम (नॉटल पाम) आदी झाडांच्या प्रजातींचा यामध्ये समावेश आहे.

२४९ झाडे शहर परिसरातील तर २५६  झाडे  पूर्व उपनगरातील आहेत. उर्वरित ३०७ झाडे पश्चिम उपनगरातील आहेत. यापैकी ५४५ झाडे ही १६ व १७  मे रोजी पडली. तर २६७ झाडे ही १८ मे रोजी पडली आहेत. 

याशिवाय वादळी वाऱ्यामुळे  मुंबईत १४५४ झाडांच्या फांद्या पडल्या. यापैकी ७९८ फांद्या या खासगी परिसरातील झाडांच्या होत्या. तर उर्वरित ६६६ फांद्या या सार्वजनिक परिसरातील होत्या.



हेही वाचा -

आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा