Advertisement

Mumbai Rain: IMD चा इशारा, मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसणार आहे.

Mumbai Rain: IMD चा इशारा, मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
SHARES

मुंबईत (Mumbai Rain) रविवारी रात्री काही ठिकाणी पाऊस पडला. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसणार आहे. दरम्यान ३ आणि ४ जूनला महाराष्ट्रातल्या काही भागात आणि गुजरातमध्ये वादळी पावसाचासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD)नं जाहीर केलं की, येत्या ४८ तासात दक्षिण-पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत असल्यानं राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस वादळी पावसाचा (Mumbai Monsoon) तडाखा बसण्याची शक्यता आहे. ३ ते ४ जून कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाचे संचालक एम. मोहपात्रा यांनी सांगितलं की, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात आणि लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र बनत आहेत. दुसऱ्या दिवशी हा अजून वाढेल आणि सायक्लोनमध्ये बदलेल. त्यानंतर हा उत्तरेकडे येईल आणि गुजरातजवळ पोहोचेल. ३ जूनला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येईल.


'या' जिल्ह्यांना फटका

हवामान विभागानं (Mumbai weather) दिलेल्या अंदाजानुसार प्रामुख्यानं कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तीन ते चार दिवस वादळी पाऊस पडेल. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आहे. पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मात्र हवामान विभागानं रविवारी परत एकदा दावा केला आहे की, मान्सून (Monsoon Update) आतापर्यंत केरळमध्ये आलेला नाही. हवामान विभागाचे संचालक एम. मोहपात्रा यांनी सांगितलं की, आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत. मान्सून एक जूननंतर येण्यासाठी परिस्थिती चांगली आहे.

मोहपात्रा यांनी सांगितलं की, हवामान विभागानं शनिवारी सांगितले होतं की, मान्सून-पूर्वचा पाऊस आणि एक किंवा दोन जूनला मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल. शनिवारी हा मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात सक्रिय आहे आणि दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व अरबी सागराकडे येत आहे आणि यामुळेच परिस्थिती मान्सूनसाठी चांगली बनली आहे.

स्कायमेटने शनिवारी दावा केला होता की, 30 मे (शनिवार) मान्सूनचे केरळच्या किनारपट्टीवर आगमन झालं आहे. तर, हवामान विभागानं एप्रिलमध्ये सांगितलं होतं की, मान्सून सरासरी सामान्य असेल. विभागानं सांगितल्यानुसार, ९६ ते १००% पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं.

दुसरीकडे, जूनपर्यंत मान्सूनचा हंगाम महाराष्ट्र राज्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी पूर्वी ही घोषणा केली होती की दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मुंबई तयार आहे. मुंबईत दरवर्षी अल्पावधीत मुसळधार पाऊस पडतो. ज्यामुळे शहरात पाणी तुंबतं. जून ते सप्टेंबर या कालावधीत शहरात शहरी भागात पूर येणं सामान्य आहे. परिणामी वाहतूक, रेल्वे सेवा बंद पडते.

नाल्यांच्या मान्सूनपूर्व कामाची तपासणी ड्रोनद्वारे करण्यात आली आहे. मिठी नदीतील सुमारे ७७ टक्के काम जलपंप चालू झाल्याने पूर्ण झालं आहे. पण पावसाळ्यामुळे शहराच्या झोपडपट्ट्यांवर परिणाम होत असल्यानं सहसा खाडी आणि सखल भागांमध्ये आव्हाने निर्माण होतात.



हेही वाचा

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा