Advertisement

Nisarga Cyclone : जाणून घ्या, चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात?

चक्रीवादळांना नावं देण्याची सुरुवात कुठून, केव्हा झाली? सुरुवातीला चक्रीवादळांना स्त्रीच्या नावावरून नावं का देण्यात याैयची, हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Nisarga Cyclone : जाणून घ्या, चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात?
SHARES

चक्रीवादळ (Cyclone Nisarga) मुंबईच्या (Mumbai Weather) दिशेनं येत आहे. यामुळे सध्या मुंबईसह (Cyclone in mumbai) किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या चक्रीवादळाचं केंद्र ईशान्येकडे सरकत आहे. दुपार नंतर चक्रीवादळ (mumbai cyclone) अलिबागजवळ धडकणार आहे. याला लँडफॉल म्हणतात.

३ जूनच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर पोहचेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यानंतर हे वादळ दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल.

अरबी समुद्रात तयार झालेल्या या चक्रीवादळाला निसर्ग नाव देण्यात आलं आहे. पण या चक्रीवादळाला निसर्ग हे नाव कसं पडलं? चक्रीवादळांची नावं कोण ठरवतात? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. आज आम्ही तुम्हाला चक्रीवादळांची नावं कशी ठरतात? हेच सांगणार आहोत.


चक्रीवादळांना नावं का देतात?

  • जगभरात अनेक चक्रीवादळं येतात. त्यापैकी कतरिना, डेव्हिड, ग्लोरिया, ओखी ही काही आहेत. बहुसंख्या चक्रीवादळांची ओळख त्यांच्या अक्षांश आणि रेखांश स्थिवरून केली जायची. यामुळे हवामान तज्ज्ञांना या वादळांचा मागोवा घेता येतो.
  • पण सर्वात मोठी समस्या होती ती लोकांना समजवण्याची. कारण लोकांना हवामान शास्त्राच्या भाषेतील ही माहिती समजवणं कठीण जायचं.
  • १९ व्या शतकामध्ये हवामान तज्ज्ञांच्या मते, चक्रीवादळाला नावं दिल्यानं ती घटना लोकांच्या लक्षात राहते.
  • यामुळे ठराविक चक्रीवादळाबद्दल अधिक प्रभावीपणे लोकांशी संवाद साधणं सोप्प होतं. उदाहरणार्थ एखादं चक्रीवादळ किन्याऱ्याला धडकणार असेल तर येणाऱ्या वादळाच्या नावानं लोकांना सुचित केलं जातं.


कधीपासून नावं दिली जातात?

  • १९५० साली अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्रानं सर्वप्रथम अटलांटिक सागरातील महावादळांना नावं देण्यास सुरुवात केली. त्यावेळ वादळांना इंग्रजी भाषेतील मुळांक्षरानुसार नावं दिली जायची. उदाहरणार्थ, बेकर चार्ली....
  • बहुतांश चक्रीवादळांना सारखी नावं दिली जायची. पहिल्या चक्रीवादळाला एबल नाव दिलं गेलं. तर दुसऱ्या आलेल्या चक्रीवादळाला देखील एबल नावं दिलं गेलं.
  • पण एकसारखी नावं टाळण्यासाठी १९५३ साली चक्रीवादळांना स्त्रीयांची नावं दिली जायची. कारण त्यावेळी जहाजांना देखील स्त्रीयांची नावं देण्यात यायची.
  • मात्र १९७९ साली या पद्धतीत बदल करून स्त्री आणि पुरुष अशी दोघांची नावं देण्यात येऊ लागली.

निसर्ग चक्रीवादळाचा धोका, बीकेसीतल्या कोरोना रुग्णांना 'या' स्थळी हलवलं


चक्रीवादळ कसं ओळखतात?

  • समुद्रात गोलाकार आकाराची हालचाल सुरू होते. त्या जागी असणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी ३९ मैल इतका प्रचंड असतो. त्यावेळी समुद्री वादळ येत असल्याचं हवामान खात्याच्या लक्षात येतं.
  • वादळाचं वेग ३९ हून ७४ मैल वाढतो. तेव्हा समुद्री वादळाचे चक्रीवादळात रुपांतर होते. मग यादीनुसार चक्रीवादळाला नाव दिलं जातं.


कशी ठरतात नावं?

  • प्रत्येक चक्रीवादळ सुरू होण्यापूर्वी हवामान तज्ज्ञांमार्फत चक्रीवादळांच्या नावाची यादी तयार होते. या यादीतील क्रमानुसार चक्रीवादळांना नावं दिली जातात. जागतिक हवामान संस्थेकडे या यादीची जबाबदारी असते.
  • चक्रीवादळाच्या नावांच्या याद्या जगभरातील मुख्य महासागरांनुसार विभागण्यात आल्या आहेत. अटलांटिक महासागरासाठी ६ याद्या आहेत.
  • ६ याद्यांनुसार प्रत्येक वर्षी एका यादीचा वापर केला जातो. २०१६ मध्ये वापरण्यात आलेल्या यादीचा २०२१ मध्ये पुन्हा वापर केला जाणार.
  • सर्वात महत्त्वाचं एखाद्या चक्रीवादळामुळे अतोनात नुकसान झालं तर त्याचं नाव यादीतून कायमचं काढण्यात येतं.
  • 'निसर्ग' चक्रीवादळाचं (Cyclone Nisarga) नाव IMD नं जारी केलेल्या १६९ यादीतून देण्याच आलं आहे.   



हेही वाचा

Nisarg Cyclone : अलिबागमधून 12 हजार नागरिकांचे केलं स्थलांतर

मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा