Advertisement

Mumbai Rains: मागील २४ तासांत मुंबईत ६.४ पावसाची नोंद

मुंबई शहरात आतापर्यंत ४९३.१ मिमी सरासरीच्या तुलनेत जून महिन्यात सुमारे ३०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai Rains: मागील २४ तासांत मुंबईत ६.४ पावसाची नोंद
SHARES

मुंबईत मागील काही दिवसांपूर्वीच मान्सून दाखल झाला. मात्र पावसानं घेतलेल्या मोठ्या विश्रांतीमुळं मुंबईकरांना उकड्यानं हैराण केलं आहे. सध्या मुंबईत पाऊस पडत सर्वत्र थंडगार वातावरण निर्माण झालं आहे. मात्र असं असलं तरी पावसानं मुंबईत दिलासादायक हजेरी अजूनही लावलेली नाही. पावसाच्या पडणाऱ्या हलक्या सरींमुळं उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी मुंबईच्या तापमानात वाढ झाली होती. मागील २४ तासांत सांताक्रूझ वेध शाळेत ६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील कुलाबा व उपनगरात हवमान कोरडं, उबदार व दमट राहणार असल्याचा अंदाज स्कॅयमेटनं वर्तवला आहे.

मुंबई शहरात आतापर्यंत ४९३.१ मिमी सरासरीच्या तुलनेत जून महिन्यात सुमारे ३०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटनं हवामानाच्या संभाव्य वातावरणाचा अंदाज व्यक्त करत कर्नाटक किनाऱ्यावर वादळाचं परिस्थिती निर्माण झाली असून, हे वादल कर्नाटक किनारपट्टीहून महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेनं सरकत असल्याचं म्हटलं.

मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून शनिवारी मुंबईसह उपनगरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा पाऊस मुसळधार नसणार आहे. त्यामुळं सामान्यांचे नियमित जीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाही. हा पाऊस २ जुलैपर्यंत असाच सुरू राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील हवामान व वातावरण दमट असल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. परंतु, पावसानं अद्याप हवीतशी हजेरी लावलेली नाही. त्यामुळं अनेक मुंबईकर पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. 



हेही वाचा -

Best Workers: बेस्टच्या तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांना चार्जशीट

Beach Shacks: ८ समुद्रकिनाऱ्यांवर उभारणार बीच शॅक्स, तुम्हीही करू शकता अर्ज



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा