Advertisement

Dahi handi festival: यंदा दहिहंडी रद्द, तरीही पथकांकडून दहीहंडीचं पूजन


Dahi handi festival: यंदा दहिहंडी रद्द, तरीही पथकांकडून दहीहंडीचं पूजन
SHARES

मुंबईतील सणांवर कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. मराठी नववर्षाची सुरू ज्या सणापासून सुरू होते तो म्हणजे गुढीपाडवा. या गुढीपाडवानिमित्त दरवर्षी गिरगाव, डोंबिवली यांसारख्या अनेक ठिकाणी रॅली काढली जाते. परंतु, यंदा रद्द करण्यात आली. त्याशिवाय, गोविंदा उत्सव सुद्धा रद्द करण्यात आला. गोविंदा उत्सवासाठी गुरूपोर्णिमेच्या मूहूर्तावर राज्यासह मुंबईतील दहीहंडी पथकांच्या सरावाचा आरंभ होतो. गुरुपौर्णिमेपासून शहर-उपनगरातील दहीहंडी पथकातील गोंविदा एकमेकांवर थर रचण्याचा कसून सराव करतात. मात्र यंदा कोरोनामुळं दहीहंडी उत्सवही रद्द करण्यात आल्यानं दहिहंड्या पाहायला मिळणार नाही.

सामाजिक भान बाळगून यंदा सर्वत्र लोकहितार्थ व साधेपणानं उत्सव होणार आहे. यंदा गुरुपौर्णिमेला रविवारी माझगावच्या श्रीदत्त क्रीडा मंडळानं टाटा रुग्णालयातील रुग्णांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केलं. गुरुपौर्णिमेला दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष व श्रीदत्त क्रीडा मंडळ या दहीहंडी पथकाचे प्रशिक्षक बाळा पडेलकर यांच्या नेतृत्वाखाली प्रथेप्रमाणे दहीहंडीचे पूजन करून हंडी बांधण्यात आली.

हेही वाचा - कोरोनाचं दहिहंडी उत्सवावर सावट, 'या' आयोजकांनी स्पर्धा केली रद्द

या पूजनासाठी दहीहंडी पथकातील अनेक गोविंदानी हजेरी लावून उत्साह वाढविला. सर्व गोविंदांनी रक्तदानही केलं. सामाजिक अंतर राखत माझगाव ताडवाडी येथील जनता केंद्र इथं टाटा रुग्णालयातील कर्करोग रुग्णांसाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जवळपास १००हून अधिक व्यक्तींनी रक्तदान करून कर्तव्य पार पाडले.

यंदा हा उत्सव सामाजिक अंतर राखणे शक्य नसल्याने रद्द केला आहे. मात्र मंडळाने राबविलेल्या रक्तदान शिबिराप्रमाणे प्रत्येक पथकाने सामाजिक जबाबदारी ओळखून उपक्रम राबवावेत, आणि अशा कठीण काळात समाजाचा आधार व्हावा. याखेरीज, उमरखाडी गोविंदा पथकानेही सरावाची हंडी बांधून गुरुपौर्णिमेची पूजा केली. 



हेही वाचा -

Amitabh Bachchan's Jalsa Bungalow ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर रक्तपात

Vasai Virar Nalasopara Containment Zones List : 'हे' आहेत वसई, विरार, नालासोपारातील कंटेन्मेंट झोन



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा