Advertisement

कमला मिलमध्ये मृत्यूला जवळून पाहणारी माला कश्यप


SHARES

गुरुवारी रात्री ११.४७ वाजेदरम्यान मी माझ्या मैत्रिणींसोबत कमला मिलमधील रेस्टाॅरंटमध्ये गेले होते. रेस्टॉरंटमधील प्रवेशद्वाराजवळच आम्ही बसलो होतो. एवढ्यात रात्री १२.२० वाजता माझ्या मैत्रिणींना आगीच्या ज्वाळा दिसल्या. पण आम्हाला वाटलं कदाचित या हॉटेलातील इव्हेंटचाच हा भाग असावा. म्हणून मी उत्सुकतेने या आगीचा व्हिडिओ काढू लागले. सुरूवातीला भलेही मला ही गंमत वाटली, असली तरी नंतर या आगीची दाहकता कळली. तेच जर माझ्या आधी लक्षात आलं असतं तर कदाचित मी अनेकांचे प्राण वाचवू शकले असते, अशी व्यथा मांडलीय या आगीच्या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार माला कश्यप हिने.


अग्नितांडव भडकलं

कधीही विसरता येणार नाही अशी ही दुर्दैवी घटना २८ डिसेंबरच्या रात्री १२.३० वाजता कमला मिल परिसरात घडली. कमला मिलमधील हॉटेल मोजोस ब्रिस्टो आणि वन अबव्ह पबला भीषण आग लागली. मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्यानंतरही या दोन्ही पब मालकांकडून हे  अनधिकृतरित्या बांधकामात हे हॉटेल चालवण्यात येत होतं. 


प्रत्यक्षदर्शीची माहिती

या आगीच्या घटनेसंदर्भात 'मुंबई लाइव्ह'ने प्रत्यक्षदर्शी माला कश्यप हिच्याशी संपर्क साधला असता. मालाने रात्री घडलेली सारी घटना सांगितली. 

मालाने पुढे मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं की, 'ही घटना घडली तेव्हा मी माझ्या मैत्रिणींसह कमला मिलमधील मोजोस ब्रिस्टो या हॉटेलात होते. त्यावेळी अचानक तिथे आग लागली. या आगीचा व्हिडिओ मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. थोड्याच वेळात आग पसरली. कारण तिथे कपड्याचे तंबू बांधलेले होते. त्याच्याच बाजूला शिशा पार्लर, आयलँड बार देखील होते. त्यामुळे आग आणखी पसरली. तिथे लोकांची गर्दी झाली. 

लोक मिळेल त्या वाटेने बाहर पडण्याचा मार्ग शोधत होते. माझ्या मित्रांपैकी एक जण फायर एक्झिटच्या जवळ गेला. तो पायऱ्यांवरून खाली उतरण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या आसपासही अनेक जण होते. पण त्या ठिकाणीही आग पसरली. त्यामुळे माझ्या मित्रासह आणखी काही जण किरकोळ जखमी झाले.

मी ८ मिनिटांच्या आत पायऱ्यांवरून तळमजल्यावर गेले. त्या रेस्टोरंटमधील कर्मचाऱ्यांसह तेथील सुरक्षारक्षकाने आम्हाला खूप मदत केली. खाली उतरल्यानंतर आम्ही तातडीने आपत्कालिन कक्षाला संपर्क करून या घटनेची माहिती दिली.

मला खात्री आहे की मृतांमध्ये जास्तीत जास्त जण हे हॉटेलमधील कर्मचारीच असावेत. कारण आग लागल्याच्या काही क्षणानंतर तेथे सिलिंडरचा ब्लास्ट झाल्याचं मी ऐकलं. याचबरोबर या हॉटेलला लागूनच आणखी एक हॉटेल तिथे होतं. तिथे असलेले लोकही नक्कीच जखमी झाले असावेत. कारण त्या हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांना या आगीविषयी काहीच माहिती नव्हती. 

हे दोन्ही हॉटेल खूप चांगले असून ही दुर्दैवी घटना आहे. मला वाटतं, जर तिथे कापडाचे तंबू उभारले नसते, तर ही आग इतक्या लवकर पसरली नसती. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा