Advertisement

महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे २२४५ रुग्ण, इंजेक्शनसाठी जागतिक निविदा

राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे २२४५ रुग्ण आहेत. या आजारावरील उपचारासाठी आवश्यक ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे.

महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे २२४५ रुग्ण, इंजेक्शनसाठी जागतिक निविदा
SHARES

राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे २२४५ रुग्ण आहेत. या आजारावरील उपचारासाठी आवश्यक ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्या माध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात या इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

मंत्रालयात मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकरमायकोसीस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर माध्यमांना माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे २२४५ रुग्ण आहेत. या आजारावर उपचारासाठी ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन वापरलं जात असून त्याची किंमत जास्त आहे. केंद्र शासनाकडून या इंजेक्शन वाटपाचं नियंत्रण केलं जात आहे. महाराष्ट्रात हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावं यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्यामाध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यात ६० हजार व्हायल्स उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा पुरवठा केंद्र शासनाकडून होत असून रुग्णसंख्येनुसार जिल्ह्यांना त्याचं वाटप केलं जात आहे. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची अद्ययावत माहिती आयडीएसपी या पोर्टलवर दिली जाईल, याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची सूचना  करण्यात आली आहे.

हेही वाचा- ‘हे’ १५ जिल्हे वगळता महाराष्ट्रात १ जूनपासून लाॅकडाऊन शिथिल?

दर निश्चितीसाठी प्रयत्न

म्युकरमायकोसीस या आजाराला महाराष्ट्र शासनाने नोटीफाईबल डिसीस म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्यासाठी राज्यभरात १३१ रुग्णालये नोटफाईड करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या राज्यात सुमारे २२०० रुग्णांपैकी १००७ रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीसचे काही रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांसाठीच्या उपचारासाठी जे दर निश्चित करण्यात आले आहेत ते म्युकरमायकोसीसच्या रुग्णांना लागू करून त्यानुसार उपचार व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

(2245 mucormycosis patients in maharashtra till 25th may 2021 says health minister rajesh tope)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा