Advertisement

मराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी

ऋतुमानानुसार काय खावं आणि काय खाऊ नये, याचा गोंधळ टाळण्यासाठीच आपल्या पूर्वजांनी आणि आचार्यांनी याचा मेळ विविध सणवारांशी घालून त्याची सुरेख गुंफण केलेली आढळते. त्यापैकीच हिवाळ्यात साजरा होणारा एक सण म्हणजे 'धुंदुर मास'.

SHARES

थंडी म्हणजे गुलाबी गारवा... थंड, गार वातावरणात गरमागरम खावं किंवा एक कटिंग चहा मारावासा प्रत्येकालाच वाटतो. मग काय आपण वडापाव, भजीपाव अशा पदार्थांवर ताव मारतो. हे खायला आपल्याला मजा येत असेल यात काही शंका नाही. पण वारंवार असे पदार्थ खाणं शरीरासाठी किती घातक आहे, याचा साधा अंदाज आपल्याला नसतो. त्यामुळे हिवाळ्यात पौष्टिक आणि आरोग्याला फायदेशीर असा आहार घेणं फार आवश्यक आहे.

महत्वाचं म्हणजे बदलत्या ऋतुमानानुसार आहार घेणं हे नेहमीचं फायद्याचं असतं. प्रत्येक ऋतूत येणारी फळं, भाज्या आपल्या शरीराची त्यावेळेची गरज पूर्ण करण्याच्या हेतूनेच निसर्गात निर्माण होत असतात. खरंतर आपणही त्यांचा 'आस्वाद' तसाच घ्यायला हवा. ऋतुमानानुसार काय खावं आणि काय खाऊ नये, याचा गोंधळ टाळण्यासाठीच आपल्या पूर्वजांनी आणि आचार्यांनी याचा मेळ विविध सणवारांशी घालून त्याची सुरेख गुंफण केलेली आढळते. त्यापैकीच हिवाळ्यात साजरा होणारा एक सण म्हणजे 'धुंदुर मास'. 'धुंदुर मास'संदर्भात क्वचितच कुणाला माहीत असावं. पण दादरमधल्या 'आस्वाद'तर्फे 'धुंदुर मास' ही संकल्पना पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे.



'आस्वाद'ची हटके संकल्पना

या संकल्पने अंतर्गत 'आस्वाद' एक हटके थाळी घेऊन आलं आहे, ज्यात उष्ण आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश आहे. आपल्या प्रत्येक सणउत्सवाला विज्ञानाची वैचारिक जोड आहे. त्याची ऋतुमानाप्रमाणे उपयुक्तता, त्याचे शररीरावर आणि मनावर होणारे सकारात्मक परिणाम तरूण पिढीत रुजावेत म्हणूनच हा आस्वादचा प्रयत्न आहे. आस्वादनं सुरू केलेल्या या उपक्रमाला मुंबईकरांसोबतच सेलिब्रिटींनी देखील पाठिंबा दिला आहे.



धुंदुर मास म्हणजे काय?

संक्रातीच्या साधारण एक महिना आधी सूर्य धनु राशीत प्रवेश करतो. संक्रातीला तो मकर राशीत प्रवेश करतो. या दरम्यानच्या एक महिन्याच्या काळाला धुंदुर मास असे म्हटले जाते. बाहेर खूप थंडी असते. अशात शरीर उष्णता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. याचाच परिणाम म्हणून या दिवसांमध्ये भूक चांगली लागते. खाल्लेले पचते आणि त्यामुळे चांगली भूक लागते. सकाळी भूक लागलेली असताना दुसरे तिसरे काही खाण्यापेक्षा पौष्टिकच आहार घ्यावा या हेतूनं धुंदुर मास साजरा केला जातो. या महिन्यात उष्ण पदार्थ म्हणजेच तीळ, गूळ, तूप अशा विशिष्ट पदार्थांचं सेवन केलं जातं. उष्ण पदार्थ खाल्यानं शरीरात साठवलेली उर्जा उष्णता निर्माण करण्यासाठी वापरावी लागत नाही.



तुम्हाला देखील या मेजवानीचा 'आस्वाद' घ्यायचा असेल, तर ७ जानेवारी आणि १४ जानेवारीला सकाळी ७ ते ९ दरम्यान दादरच्या आस्वाद हॉटेलला भेट देऊ शकता. यासाठी तुम्हाला आस्वादच्या फेसबुक पेजवर बुकिंग करावे लागणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा