Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

मुंबईच्या हाफकिन संस्थेत होणार लसची निर्मिती

केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानी मिळाली आहे.

मुंबईच्या हाफकिन संस्थेत होणार लसची निर्मिती
SHARES

केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. राज्यात कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहीमेला लसीच्या तुटवड्यामुळे ब्रेक लागत होता. अशावेळी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हाफकिनला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी (narendra modi) यांचे आभार मानले आहेत.

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीनं कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागानं मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनानं हि परवानगी दिल्यानं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावं, तसंच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.

यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २० मार्च २०२१ रोजी  हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशावेळी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा