Advertisement

कोव्हॅक्सीन लसीची चाचणी मुलांवरही होणार

कोव्हॅक्सिन या लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने आता लहान मुलांवर देखील लसीची चाचणी घेण्याची तयारी दर्शवली आहे.

कोव्हॅक्सीन लसीची चाचणी मुलांवरही होणार
SHARES

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन या कोरोना लसीचा पुढचा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. या टप्प्यात कोव्हॅक्सीन आता मुलांना प्रथमच देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात नागपूर येथून केली जाणार आहे. 

कोव्हॅक्सीन या लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने आता लहान मुलांवर देखील लसीची चाचणी घेण्याची तयारी दर्शवली आहे. २ वर्षे ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर पुढच्या महिन्यापासून ही चाचणी केली जाणार आहे. सध्या देशात १८ वर्षावरील व्यक्तीचे लसीकरण सुरु आहे.

भारतात कोरोना लसीकरणास  १६ जानेवारीपासून सुरवात झाली. मात्र, यामध्ये  पहिल्या टप्प्यात फक्त फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६५ वर्षे वयावरील लोकांनाच ही लस देण्यात येत आहे. शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना शाळेत पाठवताना पालक चिंतीत आहेत. मुलांना लसीचे संरक्षण प्राप्त झालं तर निर्धास्तपणे त्यांना शाळेत पाठवता येईल असं पालकांना वाटत आहे. 

 देशाचे औषध नियंत्रक यांच्याकडे मुलांवरील चाचणीसाठी परवानगी मागण्यात आली आहे. या टप्यात मुलांची सर्व प्रकारची तपासणी केली जाणार आहे. त्यांची कोविड चाचणी तसेच त्यांची अँटीबॉडी चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर त्यांना १४ दिवस, २८ दिवस आणि ४२ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर काही साइड इफेक्ट होतात का याची चाचणी केली जाणार आहे.या चाचण्या वय वर्षे २ ते ५, वय वर्षे ६ ते १२ आणि वय वर्षे १२ ते १८ अशा टप्प्यांमध्ये केल्या जातील. 

त्यानंतर देशातील अन्य भागात लहान मुलांना ही लस दिली जाणार आहे. कोविडच्या लसीकरणादरम्यान कोणतेही साइड इफेक्ट अद्याप दिसून आले नसल्याने डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढील महिन्यापासून नागपूर येथील विविध रुग्णालयांमध्ये ही चाचणी सुरु होणार आहे.



हेही वाचा -

रेल्वे प्रवाशांसाठी मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा

आधार कार्ड 'या' १५ गोष्टींसाठी सक्तीचं



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा